एवढे पैसे कमावून हिंदूंना किती मदत केली? विविक अग्निहोत्रींना जेष्ठ अभिनेत्रीचा सवाल

The Kashmir Files : दोन वर्षांपूर्वी आलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) कल्याणासाठी किती योगदान दिले, असाव आता करण्यात येत आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 11, 2023, 05:01 PM IST
एवढे पैसे कमावून हिंदूंना किती मदत केली? विविक अग्निहोत्रींना जेष्ठ अभिनेत्रीचा सवाल title=

The Kashmir Files : द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. अनेकांनी या चित्रपटाचे समर्थन केले तर कित्येकांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांसह कलाकारांवरही टीका केली आहे. आता दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी द काश्मीर फाइल्सच्या निर्मात्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) कल्याणासाठी किती योगदान दिले, असा सवाल आशा पारेख यांनी विचारला आहे.

एका टीव्ही मुलखीतमध्ये आशा पारेख यांनी या चित्रपटाबाबत संताप व्यक्त केला आहे. द केरल स्टोरी आणि द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन आशा पारेख यांनी भाष्य केले आहे. मी ते दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वादांबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. जर लोक हे चित्रपट पाहत असतील तर त्यांनी ते पहावे," असे आशा पारेख म्हणाल्या.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. मात्र या कमाईवरुन आशा पारेख यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना सवाल विचारला आहे. "लोकांनी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला. पण मी इथं काहीतरी वादग्रस्त बोलणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने 400 कोटींची कमाई केली. त्या पैशातून त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या कल्याणासाठी किती रक्कम दिली? ज्यांच्याकडे वीज आणि पाणी नाही त्यांना निर्मात्याने किती पैसे दिले? निर्मात्यांना नफ्यातील वाटा मिळतो. समजा, चित्रपटाच्या 400 कोटी रुपयांच्या कमाईपैकी त्याने 200 कोटी रुपये कमावले, त्यापैकी 50 कोटी रुपये ते लोकांना मदत करण्यासाठी देऊ शकला असता," असे आशा पारेख म्हणाल्या.

‘द काश्मीर फाइल्स’ चे लेखन आणि दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. काश्मीर खोऱ्यात 1990 मध्ये हिंदूंच्या क्रूर हत्येवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाची निर्मिती विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी, तेज नारायण आणि अभिषेक अग्रवाल यांनी केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.