close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रिया बापट-उमेश कामत 'या' वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र भूमिका साकारणार आहे.

Updated: Jul 11, 2019, 08:27 PM IST
प्रिया बापट-उमेश कामत 'या' वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रिया बापट आणि उमेश कामत ही सुप्रसिद्ध जोडी पहिल्यांदाच वेब सीरिजमधून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आणि काय हवं?...' या वेब सीरिजमध्ये प्रिया आणि उमेश ही जोडी एकत्र दिसणार आहेत. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर समोर आला आहे.

प्रिया आणि उमेश या जोडीला नेहमीच चाहत्यांची पसंती मिळत असते. 'टाइमप्लीज' चित्रपटाच्या अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र भूमिका साकारणार आहे. प्रिया बापटने या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रिया बापट 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. मात्र उमेश कामतने 'आणि काय हवं?...' या वेबसीरीजमधून पदार्पण केलं आहे.