प्रिया वारियरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार झाली होती.

Updated: Jan 23, 2019, 11:46 AM IST
प्रिया वारियरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाळेच्या ड्रेसवर आपल्या डोळ्यांनी इशारे करणारी मुलगी प्रिया वॉरिअरने इंटरनेटवर धमाल केली होती. तिच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार झाली होती. प्रिया प्रकाशचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तिच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सूकता दिसत होती. प्रिया वारियर आता खूपच प्रसिद्ध झाली आहे. तिचा लवकरच सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The most lethal weapon... just one shot and it took over a country of a billion peeps FOLLOW @voompla INQUIRIES @ppbakshi . #voompla #bollywood #priyavarrier #priyaprakashvarrier #bollywoodstyle #bollywoodfashion #mumbaidiaries #delhidiaries #desimemes #indianmemes #desijokes #indianjokes #winkgirl #mastimood #indianactress #bollywoodactress #bollywoodactresses

A post shared by Voompla (@voompla) on

एका प्रेस कांफ्रेंसमध्ये पत्रकारांनी प्रियाला 'ओरू अदार लव (Oru Adaar Love)' सिनेमातील डोळ्यांची ती अॅक्शन करुन दाखवण्यास सांगितली. त्यानंतर प्रियाने लगेच ती करुन दाखवली. त्यानंतर प्रियाने आणखी एक अॅक्शन केली. प्रियाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रिया लवकरच बॉलिवुडमध्ये 'श्रीदेवी बंगलो' सिनेमातून डेब्यू करणार आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. दक्षिणातील प्रसिद्धी दिग्दर्शक प्रशांत माम्बुली हे या सिनेमाची दिग्दर्शक आहेत.

या सिनेमाचं काही शूटिंग लंडनमध्ये देखील झालं आहे. सिनेमात प्रिया सोबतच अभिनेता प्रियांशु चॅटर्जी लीड रोलमध्ये आहे. सिनेमा कधी रिलीज होणार आहे याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.