'तारक मेहता'मधून दयाबेन घेणार एक्झिट?

घराघरांत पोहचलेली सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'दयाबेन' गेल्या अनेक काळापासून मालिकेपासून दूर आहे.

Updated: Jan 23, 2019, 11:33 AM IST
'तारक मेहता'मधून दयाबेन घेणार एक्झिट?

मुंबई : घराघरांत पोहचलेली सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'दयाबेन' गेल्या अनेक काळापासून मालिकेपासून दूर आहे. 'दयाबेन'ची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानी प्रसुती रजेवर होती. गेल्या वर्षी दिशाने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर मात्र सर्वांचे लक्ष दयाबेनच्या 'कमबॅक'कडे लागले आहे. मात्र, आता दिशा वकानी पुन्हा कमबॅक करणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

'बॉलिवूड लाइफ डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा वकानी पुन्हा मालिकेत काम करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत मालिकेचे निर्माते अस्ती कुमार मोदी यांना विचारले असता, 'कदाचित हे खरंही असू शकतं परंतु या निर्णयाबाबत मला माहीत नसून माझी संपूर्ण टीम दिशाशी बोलत असल्याचं' त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, दिशा वकानीची वहिनी हेमाली वकानी हिला याबाबत विचारले असता तिने हा अतिशय खासगी प्रश्न असल्याचं सांगत उत्तर टाळलं. तसेच निर्मात्यांकडूनही दयाबेनच्या पुनरागमनबद्दल कोणतंही जाहीर भाष्य केलेलं नाही.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्वच पात्रं प्रत्येकाच्या घरातील जवळची झाली आहेत. या पात्रांमुळे आणि प्रेक्षकांच्या मालिकेवरील प्रेमामुळे मालिकेच्या लोकप्रियतेतही मोठी वाढ झाली आहे. दिशा वकानी आणि मयूर पांड्या यांचा २४ नोव्हेंबर २०१५ साली विवाह पार पडला होता.