प्रियंका-निकला Lip Lock करताना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही मित्र आणि... फोटो व्हायरल

देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास ही  बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवू़डमध्येही फार लोकप्रिय आहे.

Updated: Jan 13, 2022, 08:14 PM IST
प्रियंका-निकला Lip Lock करताना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही मित्र आणि... फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास ही  बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवू़डमध्येही फार लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावरही फार ऍक्टिव्ह असते. तिचे जगभरात अनेक फॉलोअर्स असल्यामुळे भारतातच नाही, तर जगभराती तिची चर्चा होते. प्रियांका तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. ती बर्‍याचदा इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये अतिशय आकर्षक आणि सुंदर कपडे परिधान करताना दिसते. सोशल मीडियावर तिचे दररोज अनेक फोटो व्हायरल होतात. जे चाहत्यांना खूप आवडतात. बऱ्याचदा ती स्वत: देखील आपल्या चाहत्यांसाठी फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते.

सध्या प्रियांकाचा असा फोटो सोशल मीडियावर आहेत. ज्यामध्ये ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच निक जोनासला किस करताना दिसत आहे. त्याचवेळी निकचा मित्र ग्लेनही त्याच्या शेजारी उभा राहून यावर रिएक्शन देताना दिसत आहे.प्रियांका चोप्रा जोनासचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटोंमध्ये ती पती निकसोबत रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहे.

पा फोटो 2020 च्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा असल्याचा सांगितले जात आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने बिकिनीवर लांब पांढरा श्रग घातला आहे. यासोबत तिने हलक्या तपकिरी रंगाची टोपीही घातली आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखी चांगला दिसत आहे.

त्याच वेळी, तिचा पती निक जोनासने फंकी शर्ट आणि शॉर्ट्स घालून तिच्या बाजूला उभा आहे. ज्यामध्ये अभिनेता निक जोनास खूपच मस्त दिसत आहे. दोघांचा हा फोटो एका जहाजावर क्लिक करण्यात आला आहे. 

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच हॉलिवूड रिलीज झालेल्या 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन' चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिच्या पात्राचे नाव सती आहे. त्याचा चित्रपट लोकांना खूप आवडला. तिच्या अभिनयाचे चाहते खूप कौतुक करत आहेत. देसी गर्ल लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

येत्या काही दिवसांत ती 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. अभिनेत्रीच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.