भारतात परल्यानंतर Priyanka Chopra थेट पोहोचली तिच्या अड्ड्यावर, Video Viral

प्रियांकाच्या अड्ड्यावर तुम्हीही नक्की गेले असणार; व्हिडीओ पाहून तुमच्याही जुन्या आठवणी होतील ताज्या  

Updated: Nov 3, 2022, 09:37 AM IST
भारतात परल्यानंतर Priyanka Chopra थेट पोहोचली तिच्या अड्ड्यावर, Video Viral  title=

Priyanka Chopra Old Haunt Video: प्रत्येकाच्या आयुष्यात एक असं ठिकाण असतं ज्याठिकाणी गेल्यानंतर एक वेगळा आनंद आणि समाधान वाटतं. एवढंच नाही तर, आपण कुटुंबापासून लांब राहत असू तर आपल्या घरी परतल्यानंतर जो आनंत असतो, तो व्यक्त करण्यासाठी शब्द देखील कमी पडतील. सध्या हा आनंद अभिनेत्री प्रियांका (Priyanka Chopra) चोप्रा अनुभवत आहे. लग्नानंतर प्रियंका अनेरिकेत राहते. लग्नानंतर तीन वर्षांनंतर अभिनेत्री भारतात परतली आहे. (Priyanka Chopra in mumbai)

प्रियांका 1 नोव्हेंबर रोजी भारतात परतली. भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत आली आहे. अनेक वर्षांनी मुंबईत आल्यानंतर प्रियांका पहिल्यांदा तिच्या जुन्या अड्ड्यावर पोहोचली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, 'आपल्या जुन्या अड्ड्यावर घालवलेले क्षण मग ते एका मिनिटाचे असले तरी हरकत नाही... मी तुला प्रचंड मिस केलय मुंबई...'

सध्या प्रियांकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फक्त प्रियांकाच नाही तर, मुंबई राहणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी ‘मरीन ड्राइव्ह’ भेट दिलीच असेल. त्यामुळे तीन वर्षांनंतर तीन वर्षांनंतर ज्या आनंदात प्रियांकाने जुन्या आठवणी ताज्या केल्या. त्याचप्रमाणे व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील आयुष्यातील खास क्षण आठवले असतील.