प्रियंका चोप्रा करतेय 'या' १० वर्ष लहान अभिनेत्याला डेट...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन टी.व्ही. सिरीज क्वॉंटिको मुळे प्रसिद्धीझोतात आहेच. 

Updated: Jun 12, 2018, 12:37 PM IST
प्रियंका चोप्रा करतेय 'या' १० वर्ष लहान अभिनेत्याला डेट... title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन टी.व्ही. सिरीज क्वॉंटिको मुळे प्रसिद्धीझोतात आहेच. पण त्याचबरोबर तिच्या अफेअरमुळेही चर्चेत आहे. सध्या प्रियंकाच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आहेत. सोशल मीडियावर अमेरिकन अभिनेता आणि सिंगर निक जोनससोबत प्रियंकाचे फोटोज व्हायरल होत आहेत.

यावरुन अफेअरच्या चर्चेला मिळाला दुजोरा

ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये नामिनेटेड सिंगर, अभिनेता निक जोनससोबत प्रियंका चोप्राच्या अफेअरच्या चर्चा खूप काळापासून होत आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोजवरुन प्रियंका, निकला डेट करत असल्याचे वाटते. काही दिवसांपूर्वी निकने प्रियंकाच्या एका फोटोवर कमेंट करतना हार्ट इमोटिकॉन पाठवला. 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचे व्हायरल होणारे फोटोज निकच्या कजिनच्या लग्नातील आहेत. फोटोत प्रियंका चोप्राने गोल्डन ड्रेस घातला आहे आणि निकच्या हातात हात घालून चालत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोतून दोघांमध्ये काहीतरी नक्कीच आहे, याचा संकेत मिळत आहे. 

दोघांच्या नात्यातील आश्चर्यकारक गोष्ट

पण या दोघांच्या नात्यातील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे निक, प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. निक २५ तर प्रियंका ३५ वर्षांची आहे. पण प्रेमात सारं माफ असतं आणि वय तर फक्त एक नंबर आहे.

अशी झाली ओळख

प्रियंका आणि निकची भेट क्वांटिको च्या सेटवर एका कॉमन फ्रेंडतर्फे झाली. यानंतर २०१७ मधील गाला इवेंटमध्ये दोघांनाही हातात हात घालून एकत्र स्पॉट करण्यात आले. दोघांना बेसबॉल मॅचदरम्यानही एकत्र पाहण्यात आले. प्रियंका-निकच्या नात्याची सत्यता फक्त प्रियंकाच सांगू शकते. यापूर्वी प्रियंका-शाहरुखचे अफेअर चांगलेच चर्चेत होते.