निक जोनास निघालाय सासरवाडीला, प्रियंकाची पोस्ट व्हायरल!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जवळपास ३ वर्षांनी भारतात परतत आहे

Updated: Nov 1, 2022, 12:16 AM IST
निक जोनास निघालाय सासरवाडीला, प्रियंकाची पोस्ट व्हायरल!

Priyanka Chopra Daughter Malti India Visit : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जवळपास ३ वर्षांनी भारतात परतत आहे. प्रियांका तिची मुलगी मालती निक जोनाससोबत पहिल्यांदाच तिच्या घरी येत आहे. मायदेशी परतण्यासाठी प्रियांका खूप उत्सुक आहे. 

सोशल मीडियावर तिने चाहत्यांसाठी एक फोटोही शेअर केला आहे. पासचा फोटो शेअर करताना प्रियांका चोप्राने म्हटलं आहे की, जवळपास 3 वर्षांनी शेवटी घरी जात आहे. कोविड महामारीनंतर प्रियांका चोप्रा स्वदेशी परतणार आहे. प्रियांकाने यंदाची दिवाळी आपल्या लेकीसोबत साजरी केली आहे. प्रियंका जरी परदेशात राहत असली तरी ती सोशल  मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात राहते. प्रियांकाच्या चाहत्यांनाही ती येत असल्याने आनंद झाला आहे. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते. या जोडप्याने या वर्षी 2022 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी मालतीला जन्म दिला. कोविड महामारीच्या काळात प्रियांका आणि निक जोनास लॉस एंजेलिसच्या घरात राहत होते. 

प्रियांकाचे 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एंडिंग थिंग्स'  हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यासोबतच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या कार्यक्रमामधून प्रियांका ओटीटी माध्यमामध्ये पदार्पण करणार आहे.