Priyanka Chopra होणार आई, पाहा कधी देणार गुड न्यूज; स्वत:अभिनेत्रीचं स्पष्टीकरण

प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान आता प्रियांका लवकरच आई होण्याची बातमी समोर येत आहे.

Updated: Jan 18, 2022, 05:17 PM IST
Priyanka Chopra होणार आई, पाहा कधी देणार गुड न्यूज; स्वत:अभिनेत्रीचं स्पष्टीकरण title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आयुष्यात खूप बिझी आहे. ती तिच्या चित्रपट किंवा कार्यक्रमात इतकी व्यस्त असते की, स्वत:साठी देखील तिच्याकडे वेळ नसतो. 2018 मध्ये प्रियंका चोप्राने अमेरिकेतील सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार लग्न केले. ज्यानंतर ती निक सोबत बऱ्याच कार्यक्रमात दिसली. दोघांची जोडी फारच सुंदर दिसते. परंतु प्रियांका आणि निकच्या लग्नाला काही वर्ष होत नाही तोपर्यंतच या दोघांमध्ये घटस्फोट येण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ही धक्का बसला आहे.

प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान आता प्रियांका लवकरच आई होण्याची बातमी व्हायरल होत आहे.

खरंतर एका मुलाखतीत अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुलांबद्दल आणि भविष्याबद्दल वक्तव्य केलं. ती म्हणाली, 'मी आणि निक जोनासच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तयार आहेत. आता काय होईल ते पाहिले जाईल.'

अलीकडेच, व्हॅनिटी फेअर मॅगझिनशी बोलताना प्रियांका चोप्राने मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर जे उत्तर दिले. त्यानंतर प्रियांकाच्या आई होण्याविषयी अनेक बातम्या समोर येऊ लागला. ज्यामध्ये प्रियांका कधी आई होणार असल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

आई आणि कॅप्टन मधु चोप्रा आजी होण्याची अपेक्षा करत आहेत असा मुलाखतीत प्रियांकाला प्रश्न उपस्थीत केल्यानंतर, याला उत्तर देताना प्रियांका चोप्राने उत्तर दिले की, 'हा आमच्या भविष्यातील एक मोठा भाग आहे. देवाची कृपा असेल तेव्हा ते होईलच.'

जेव्हा देसी गर्लला विचारले गेले की, ती आणि निक चित्रपटांच्या सरावासाठी खूप व्यस्त आहेत, तेव्हा अभिनेत्रीने मजेत उत्तर दिले की, 'नाही, आम्ही सरावात जास्त व्यस्त नाही. मी यासाठी ओके आहे. निक देखील ओके आहे, आम्ही दोघेही यासाठी ओके आहोत.'

2019 मध्ये प्रियांकाने वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, घर विकत घेणे आणि मूल हे दोन्हीही तिच्या यादीत आहेत.

देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, देसी गर्ल नुकतीच 'द मॅट्रिक्स'मध्ये दिसली होती, या चित्रपटात भारताची ही सुंदर अभिनेत्री सतीच्या भूमिकेत आहे, तर प्रियांका चोप्राच्या बॉलीवूड चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत.