बॉलिवूडमधील राजकारणाला कंटाळले म्हणणाऱ्या प्रियांकासमोर करण जोहर येताच केलं असं काही, VIDEO तुफान व्हायरल

अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील (Bollywood) राजकारणाला कंटाळून आपण हॉलिवूडमध्ये (Hollywood) आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा करण जोहरचा उल्लेख करत त्याच्यामुळेच प्रियांकाला त्रास होत होता असा दावा केला आहे.   

Updated: Apr 1, 2023, 05:38 PM IST
बॉलिवूडमधील राजकारणाला कंटाळले म्हणणाऱ्या प्रियांकासमोर करण जोहर येताच केलं असं काही, VIDEO तुफान व्हायरल title=

Priyanka Chopra Meets Karan Johar: अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच बॉलिवुबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमधील राजकारणाला कंटाळूनच आपण भारत सोडल्याचं प्रियांकान म्हटलं आहे. चित्रपटसृष्टीतील काही लोकांनी आपल्याला बाजूला ढकललं असल्याचं सांगताना प्रियांकाने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र प्रियांकाचा निशाणा करण जोहरवर होता असा दावा कंगना रणौतने (Kangana Ranaut)केला आहे. त्यातच अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा आणि करण जोहर आमने-सामने आले होते. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नुकताच मुंबईत निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमाचा उद्धाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमासाठी संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं. प्रियांका चोप्राही या कार्यक्रमासाठी खास लॉस एंजेलिस येथून मुंबईला आली होती. यावेळी तिची मुलगी मालती आणि पती निक जोनसही होते. 

प्रियांका चोप्रा उद्घाटन कार्यक्रमासाठी पोहोचली असताना यावेळी करण जोहरशी तिची भेट झाली. यावेळी ते एकमेकांची गळाभेट घेतानाचा तसंच गप्पा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी तिथे प्रियांकाचे बाजीराव-मस्तानी चित्रपटाली सह-कलाकार रणवीर सिंग आणि दिपिकाही होते. करण जोहर प्रियांकाला भेटण्याआधी त्यांनाही भेटत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

प्रियांका चोप्राने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनेकदा हजेरी लावली आहे. दरम्यान त्यांचा सध्याचा व्हिडीओ पाहता सर्व काही आलबेल असल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jerry x Mimi (@jerryxmimi)

प्रियांकाने काय म्हटलं होतं?

प्रियांकाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये आपल्याला एका बाजूला ढकललं जात होतं असा आरोप केला होता. यावेळी तिने कोणाचंही नाव घेता त्यामुळेच आपण हॉलिवूडला गेले असं सांगितलं आहे. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही. येथील राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता असं प्रियांकाने सांगितलं होतं. 

कंगनाने करण जोहरवर साधला होता निशाणा

प्रियांका चोप्राने दिलेल्या मुलाखतीवर भाष्य करताना कंगनाने ट्विट करत करण जोहरने तिच्यावर बंदी घातली होती हे सर्वांनाच माहिती असल्याचं म्हटलं होतं. करण जोहरने इतका छळ केला की, तिला भारत सोडावा लागला असा आरोपच कंगनाने केला आहे. 

"प्रियांकाचा करणसोबत वाद झाल्यानंतर मीडियाने मोठ्या प्रमाणात तिच्याबद्दल लिहिलं. शाहरुख खान आणि मुव्ही माफियांसोबत असणाऱ्या तिच्या मैत्रीमुळे तिचा एक पंचिंग बॅग म्हणून वापर करण्यात आला. या छळाला कंटाळून तिला भारत सोडावा लागला," असं ट्वीट कंगनाने केलं आहे. 

या घृणास्पद, मत्सरी, क्षुद्र आणि विषारी व्यक्तीला चित्रपटसृष्टीतील संस्कृती आणि वातावरण नष्ट करण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे. त्याच्या टोळी आणि माफिया पीआरवर छापे टाकून बाहेरच्या लोकांना त्रास देण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे अशी मागणीही कंगनाने केली.

प्रियांका चोप्रा लवकरच हॉलिवूड चित्रपट Love Again मध्ये दिसणार आहे. यामध्ये निक जोनस पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असणार आहे. तसंच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' चित्रपटासाठी ती शुटिंग करत आहे.