प्रियंकाच्या वाढदिवस सेलिब्रेशनला सुरूवात, आईकडून लहानपणीचा फोटो शेअर

प्रियंकाचा हा फोटो पाहिलात का?

Updated: Jul 10, 2019, 07:46 PM IST
प्रियंकाच्या वाढदिवस सेलिब्रेशनला सुरूवात, आईकडून लहानपणीचा फोटो शेअर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या वाढदिवसासाठी एक आठवडा बाकी आहे. १८ जुलै रोजी प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. प्रियंका चोप्राची आई मधु चौप्रा यादेखील आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहेत. मधु चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर प्रियंकासोबतचा तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 

प्रियंकाचा लहानपणीचा हा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर सर्वांसमोर आला आहे. प्रियंकाच्या लहानपणीचा हा फोटो शेअर करत त्यांनी 'Birthday bumps... coming up!!!' असं कॅप्शनही दिलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Madhu Akhouri Chopra (@madhumalati) on

यंदाचा वाढदिवस प्रियंकासाठी खऱ्या अर्थाने खास असणार आहे. निक आणि प्रियंकाच्या लग्नानंतर प्रियंकाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. सध्या प्रियंका पती निक जोनाससह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी निक आणि प्रियंकाचा पॅरिसमधील एक फोटो व्हायरल झाला होता.

 
 
 
 

A post shared by Madhu Akhouri Chopra (@madhumalati) on

 
 
 
 

A post shared by Madhu Akhouri Chopra (@madhumalati) on

डिसेंबर २०१८ मध्ये निक आणि प्रियांकाचा उदयपूरमधील उम्मेद भवनमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू प्रथेप्रमाणे लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये रिसेप्शनही ठेवलं होतं. या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

प्रियंकाने फरहान अख्तर आणि जायरा वसीमसोबत सोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'द स्काय इज पिंक' येत्या ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.