प्राण्यांकडून शिका, धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओची होतेय चर्चा, तुम्ही पाहिला का?

धर्मेंद्र यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. काय आहे व्हिडीओमध्ये? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 13, 2024, 03:07 PM IST
प्राण्यांकडून शिका, धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओची होतेय चर्चा, तुम्ही पाहिला का?  title=

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या पायावर एक गिलहरी चालताना दिसत आहे. ही गिलहरी धर्मेंद्र यांच्या पायावरून खाली उतरण्यास नकार देत आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, ती धर्मेंद्र यांच्या शूजपर्यंत गेली पण ती त्यांच्या पायावरून खाली उतरली नाही. गिलहरी धर्मेंद्र यांच्या पायावर राहायचं आहे असे वाटत आहे. ही गिलहरी खूपच हट्टी आहे असं दिसत आहे. मात्र, व्हिडीओमध्ये एक व्यक्ती धर्मेंद्र यांच्या पायातून गिलहरी काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, Love you all आणि कॅप्शनच्या पुढे अनेक हार्ट इमोजी बनवले आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर या व्हिडीओवर काही चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

व्हिडीओवरील कमेंट्स चर्चेत 

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.  एका चाहत्याने म्हटलं आहे की, नमस्कार पाजी, या गिलहरीला तुमच्या सोबत खेळायचे आहे. आजकाल तुम्ही खूप व्यस्त आहेत. ती तुमची खेळण्याची वेळ मागत आहे. प्रत्येकजण तुमच्यावर किती प्रेम करतो ते पहा. या पृथ्वीतलावर असा कोणीही नाही जो तुमच्यावर प्रेम करत नाही. या व्हिडीओवर धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलनेही एक इमोजी शेअर केली आहे. त्यासोबतच तिने वडिलांना वाईट नजर लागू नये म्हणून एक खास इमोजी शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

धर्मेंद्र यांच्या कौतुकाने जन्नत भावूक

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र हे एका छोट्या पडद्यावरील शो लाफ्टर शेफमध्ये दिसले होते. या शोमध्ये अली गोनी, अंकिता लोखंडे, विकी जैन, जन्न जुबेर, कृष्णा अभिषेक यांच्या प्रत्येक स्पर्धकाने त्यांच्यासाठी जेवण तयार केले होते. त्यानंतर जेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांनी तयार केलेले जेवण चाखले तेव्हा त्यांनी जन्नतचे कौतुक केले. तेव्हा जन्नत भावूक झाली आणि रडू लागली.