प्रियंकाने शेअर केला स्वातंत्र्य दिवसानिमित्त स्पेशल फोटो

देशभरात ७०वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही हा दिवस आनंदाने साजरा करीत असतात.

Updated: Aug 15, 2017, 12:25 PM IST
प्रियंकाने शेअर केला स्वातंत्र्य दिवसानिमित्त स्पेशल फोटो title=

मुंबई : देशभरात ७०वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही हा दिवस आनंदाने साजरा करीत असतात.

आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करीत असतात. अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही स्वातंत्र्य दिवसा निमित्त एक खास फोटो शेअर केलाय. स्वातंत्र्य दिवसाच्या तिने शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिरंग्याचे तीन रंग असलेल्या एक ओढनी घेऊन फोटो ट्विटरवर शेअर केलाय. #MyHeartBelongsToIndia असा टॅगही तिने या फोटोसोबत वापरला आहे. प्रियंका सध्या हॉलिवूडमध्येही मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. त्यातून वेळ मिळाल्यावर ती भारतात येऊन इथलं काम करते. 

‘क्वॉंटिको’ सीरीजच्या पुढील शूटींग ती करत असून एका हॉलिवूड सिनेमाचंही शूटींग ती करत आहे. बॉलिवूडच्याही काही महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये ती दिसणार आहे.