मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाला सुरूवात झाली आहे. आता सलमान खानच्या चाहत्यांना अजून एक खूषखबर मिळणार आहे. 'भारत' चित्रपटाच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलमान खानसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'भारत' चित्रपटामध्ये झळकणार आहे.
सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ही जोडी 10 वर्षांनी पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे सलमान आणि प्रियांकाच्या चाहत्यांना या चित्रपटाची विशेष उत्सुकता आहे.
सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे. 2019 च्या ईदला 'भारत' हा सिनेमा येणार आहे.
And it begins “Bharat” @BeingSalmanKhan . A journey of a man and a nation together . Eid 2019 pic.twitter.com/nD05ca2FDE
— ali abbas zafar (@aliabbaszafar) April 16, 2018
'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. 'भारत' या चित्रपटाला भारत- पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटाची कथा देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार्या एका मुलाच्या जिद्दीची कथा आहे.
प्रियांका चोप्राप्रमाणेच कॅटरिना कैफदेखील 'भारत' चित्रपटाचा भाग होणार आहे. मात्र त्याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
2016 साली प्रियांका चोप्रा 'जय गंगाजल' या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. त्यानंतर प्रियांका हॉलिवूडमध्ये गेली. हॉलिवूडची सिरियल 'क्वांटिको'च्या शूटिंगमध्ये प्रियांका व्यस्त होती. आता दोन वर्षांनी प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.