ओपरा विनफ्रे यांच्या शोमध्ये प्रियंकाने घातला एवढा महागडा ड्रेस, जाणून घ्या किंमत

प्रियांकाच्या ड्रेसची किंमत ऐकुन तुम्ही चक्रावुन जाल

Updated: Mar 23, 2021, 01:57 PM IST
ओपरा विनफ्रे यांच्या शोमध्ये प्रियंकाने घातला एवढा महागडा ड्रेस, जाणून घ्या किंमत title=

मुंबई: सोशल मीडियावर देसी गर्ल प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. नुकतंच प्रियांकाने लिहिलेल्या तिच्या पहिल्या पुस्तकाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. सगळ्यात जास्त विकलं गेलेल्या पुस्तकांमध्ये 'प्रियंका चोप्रा जोनास' हे पुस्तक विकलं गेलं होतं.. नुकतंच जगातील सर्वात प्रसिद्ध टॉक शोच्या होस्ट ओपरा विनफ्रे यांनी प्रियांकाची मुलाखत घेतली.

यावेळी, प्रियंकाने परिधान केलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला. हा ड्रेस आर्कषणाचा विषय तर ठरत आहेच.. त्याचबरोबर प्रियांकाचा हा ड्रेस डोळ्यांचं पारण फेडणारा होता हे नक्की. शो दरम्यान प्रियंकाने निकसोबतच्या लग्नाविषयी आणि हॉलिवूडमध्ये कामाविषयी बरीच चर्चा केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

या शोसाठी प्रियंका चोप्राने एक विम्सिकल जंपसूट परिधान केला होता. लाईट आकाशी रंगाच्या लोकर क्रेप ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. प्रियंकाचा एक खांदा पूर्ण स्लीव्ह्जने झाकला होता, ज्याच्या डाव्या बाजूला कंबरेजवळ कटआउट होते. प्रियांकाचा हा ड्रेस खूप प्रोफेशनल टच देणारा होता.

या मुलाखतीसाठी प्रियंकाने या आउटफिटसह सिल्व्हर स्ट्रॅपी हील्स घातल्या होत्या त्याचबरोबर मॅचिंग इयररिंग्जही घातले होते. प्रियांकाचे फॅन्स प्रियांकाच्या या लूकवर घायाळ होतील हे नक्की... चाहते तिच्या या लूकचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

मात्र प्रियंकाने परिधान केलेल्या ड्रेसच्या किंमतीचा कदाचित तुम्हाला अंदाज नसेल.. तुम्ही देखील प्रियांकाच्या ड्रेसची किंमत ऐकुन चक्रावुन जाल. प्रियांकाचा जंपसूट फ्रेंच फॅशन डिझायनर रोलँड मॉरेट यांनी केली आहे. हा ड्रेस त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर १, ४९५ डॉलर्सला उपलब्ध आहे. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये १,४९,८६९ रुपये इतकी आहे.

प्रियांका सध्या लंडनमध्ये 'सिटाडल' वेब सीरिजसाठी शूट करत आहे. याआधी, तिने 'मॅट्रिक्स 4' या हॉलिवूड सिनेमाचे शूट पूर्ण केलं. या सिनेमात ती हॉलिवूड अभिनेता कीनू रीव्हसबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.