Puneet Rajkumar Birth Anniversary: कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमारची आज जयंती आहे. पुनीतचा जन्म 17 मार्च 1975 रोजी चेन्नईत झाला होता. पुनीत हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होता. पुनीत हा गरजुंच्या मदतीसाठी नेहमीच तयार असायचा. इतकंच नाही तर तो अनेक मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा, म्हणजेच त्यानं फ्रीमध्ये अनेक मुलांना शिक्षण दिलं.
पुनीत राजकुमारविषयी सांगायचे झाले तर मैसूरमध्ये असलेल्या एका आश्रमासाठी तो काम करायचा. त्या आश्रमाचं नाव शक्ति धाम असं आहे. त्याच्या आईच्या मदतीनं तो इथली सगळी कामं सांभाळायचा. त्यानं जवळपास 1800 अनाथ मुलांना दत्तक घेतलं होतं, त्यासोबत त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील तोच पाहत होता. कोणताही खेळ, सामाजिक आयोजनासाठी कोणत्याही प्रकारची फी घेत नव्हता. ही सगळी सामाजिक कार्य करत असताना तो त्यानं कमावलेल्या पैशांनी करायचा. त्यासाठी कोणतीही वेगळी चॅरिटी त्यानं सुरु केली नव्हती असं म्हटलं जातं. त्याच्या निधनानंतर त्या 1800 मुलांची जबाबदारी ही दाक्षिणात्य अभिनेता विशालनं घेतली.
पुनीत फक्त मुलांचा सांभाळ करत नव्हता तर त्याचसोबत वृद्धांची देखील काळजी घ्यायचा. पुनीतनं 46 अनाथ आश्रम, 26 अनाथालय, 16 वृद्धाश्रम, 19 गोशाळा यांचा एकत्र सांभाळ करत होता. आज तो जरी नसला तरी त्याचं काम आजही सुरु आहे. त्याच्या निधनानंतर त्याच्या या संपूर्ण कामाची जबाबदारी त्याचं कुटुंब सांभाळत आहे. मात्र, त्याच्या कुटुंबानं याविषयी कधीही कोणती माहिती दिली नाही. त्याचं कुटुंब हे मनमोकळेपणानं मदत करतं. करोना काळात त्यांनी 50 लाख रुपये दान केले होते.
हेही वाचा : 'न्यूडिटी दाखवायचीये तर...'; मुकेश खन्ना यांचा रणवीर सिंगवर संताप! कारण ठरलं 'शक्तिमान'
पुनीत राजकुमारविषयी बोलायचे झाले तर पुनीत राजकुमार एक कन्नड अभिनेता आहे. त्याशिवाय तो बॅकग्राऊंड सिंगर, टिव्ही सेलिब्रिटी आणि चित्रपट निर्माता होता. 29 ऑक्टोबर 2021 मध्ये पुनीतचं हार्ट अटॅकनं निधन झालं. पुनीत राजकुमारनं अप्पू या नावानं जास्त काम केलं आहे. तर पुनीतनं एक बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी पुनीतला सर्वश्रेष्ठ बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता. तर चालिसुवा मोदागालु आणि येराडु नक्षत्रगलुसाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार कर्नाटक राज्य पुरस्कार देखील मिळाला होता. आज पुनीत आपल्यासोबत नसला तरी देखील त्याच्या आठवणी या आपल्यासोबत आहेत.