मुंबई : काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगली की, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या नात्यात दुरावा आला. हा दुरावा नेमका का आणि कसा आला, अशाच प्रश्नांनी मग चाहत्यांच्या मनात घर केलं. अनुष्कानंच विराटपासूनचा दुरावा तिच्या कॅमेरात टीपत सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली होती.
हा दुरावा होता, कोरोनामुळं असणाऱ्या क्वारंटाईन आणि बबल च्या अटीचा. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठीच उचलल्या जाणाऱ्य़ा पावलांपैकी हे एक पाऊल. असो, कोरोनामुळं या परिस्थितीचा सामना अनुष्का आणि विराटला यापूर्वीही करावा लागता होता. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती. पण, मुद्दा असा की, सरतेशेवटी त्यांच्यामध्ये असणारा हा दुरावा अखेर संपला आहे.
दुरावा संपवत एका आनंदपर्वाचा अनुभव घेण्यासाठी कारणीभूत ठरलीये ती म्हणजे विराटची लेक वामिका. अनुष्कानं विराट वामिकाशी खेळत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. एकाच फ्रेममध्ये माझं संपूर्ण हृदय.... असं लिहित तिनं हा फोटो पोस्ट केला.
फोटोमध्ये पाठमोरी बसलेली, दोन झेंडू बांधलेली वामिका मोठ्या कुतूहलानं तिच्या वडिलांकडे म्हणजेच विराटकडे पाहताना दिसत आहे. तर, तिच्यासोबत असण्याचा आनंद विराटच्याही चेहऱ्यावरुन झळकत आहे. बाप- लेकीची ही जोडी इन्स्टाग्रामवर सर्वांच्याच मनाचा ठाव घेऊन जात आहे.