सलमान खान दिग्दर्शक तर अनिल कपूर कॅमेरामन, व्हिडिओ व्हायरल

अबुधाबीमध्ये सिनेमाचं शूट सुरू असतानाचा हा व्हिडिओ आहे. 

Updated: May 20, 2018, 08:42 AM IST

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानहा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. रेस च्या पहिल्या दोन सिक्वलमध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होता. तर रेस ३ मध्ये सलमान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सलमान खानने या सिनेमात सैफ अली खानला रिप्लेस केलयं. रेस ३ मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि अनिल कपूर सोडून सलमान खानसोबत संपूर्ण टीम नवीन आहे. या सिनेमात बॉबी देओल, साकीब सलीम आणि डेझी शहा हे कलाकारही आहेत. हा सिनेमा शूट करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय.  अबुधाबीमध्ये सिनेमाचं शूट सुरू असतानाचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये जॅकलिन आपल्याला शूट कस सुरू आहे याबद्दल सांगतेय.

कोण काय करतय ?

कोरिओग्राफर रेमो डिसुजा 'रेस ३' चे दिग्दर्शन करणार आहे. पण हा व्हिडिओ पाहता सलमाननेच याचे दिग्दर्शन केलय अस तुम्हाला वाटू शकतं. अभिनयासोबतच दिग्दर्शन करताना या व्हिडिओत दिसतोय.अनिल कपूर हातात कॅमेरा घेऊन दिसतो. त्याचसोबत डेजी शाहने आर्ट डिरेक्टरची जबाबदारी संभाळली आहे. तर साकिब सलीम लाइटमन झालेला दिसतोय. बॉबी देओल यामध्ये कॉस्ट्यूम दादा बनलाय. कोण अशा लोकांना एक्टर बनवत यार? अस दिग्दर्शक बनलेला सलमान रागात म्हणताना दिसतोय.