राधिका आपटेने 'या' हॉलिवूड स्टारला लावलं वेड

कोण आहे हॉलिवूड स्टार 

राधिका आपटेने 'या' हॉलिवूड स्टारला लावलं वेड

मुंबई : अमेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने सांगितलं की, भारतीय अभिनेत्री राधिका आपटे मॅजिकल आहे. स्टेना आपल्याला लवकरच द्वितीय विश्व  युद्धावर आधारित सिनेमात राधिका आपटेसोबत दिसणार आहे. स्टेनाने दिलेल्या माहितीनुसार, तिला राधिका आपटेचं काम आवडल्याचं सांगितलं. 

आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, राधिका आपटेचं काम हे मॅजिकल आहे. तिच्यासोबत काम करताना अतिशय आनंद झाला असून ती खूप खास आहे. म्हणूनच भारतीय प्रेक्षक तिला सर्वाधिक पसंत करतात. 

सिनेमाबद्दल सांगताना म्हणाली की, आम्ही जूनमध्येच सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं. आता याच एडिटिंग होत आहे. दुसऱ्या महायुद्धात हेरगिरी करणाऱ्या तीन महिलांच्या वास्तविक जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. 

पुढे सिनेमाबद्दल सांगितलं की, मी या सिनेमात ब्रिटीश हेरचं कॅरेक्टर साकारत आहे. या सिनेमाकरता आम्ही असाधारण महिलांबद्दल भरपूर वाचन केलं. त्याच खऱ्या दुसऱ्या महायुद्धातील नायिका राहिल्या आहेत. 

राधिकाने सिनेमात भारतीय-ब्रिटीश हेर नूर इनायत खानची भूमिका साकारली आहे. तिचं काम अतिशय प्रभावी असून स्टेनाने सांगितलं की, तिला भारतीय सिनेमांत काम करायला अतिशय आवडले. 

राधिका सध्या 'बॉम्बेरिया'ला मिळणारा प्रतिसाद बघून अतिशय खुश आहे. तिला आशा आहे की, ट्रेलर बघून प्रेक्षक या सिनेमाला पसंत करतील अशी आशा आहे. या सिनेमात राधिका आपटेसोबत रवि किशन आणि सिद्धार्थ कपूर लीड रोलमध्ये आहेत.