close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अडल्ट सीन व्हायरल झाल्यामुळे राधिका संतापली

राधिकाची तीव्र शब्दांत नाराजी

Updated: Jul 17, 2019, 08:23 PM IST
अडल्ट सीन व्हायरल झाल्यामुळे राधिका संतापली

मुंबई : बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात आपली ओळख बनवणारी अभिनेत्री राधिका आपटे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. राधिका आपटे आणि 'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेता  देव पटेल आगामी ब्रिटिश अमेरिकी चित्रपट 'द वेडिंग गेस्ट'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

मात्र या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. 'द वेडिंग गेस्ट'मधील राधिका आणि देव पटेल यांचे काही अडल्ट फोटो व्हायरल, व्हिडिओ ऑनलाईन लीक करण्यात  आले. 

राधिका आणि देव पटेल यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राधिकाने यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने, ''द वेडिंग गेस्ट'मध्ये अनेक सुंदर सीन आहेत. मात्र या चित्रपटातील हाच सीन लीक झाला आहे. ही अतिशय विचित्र गोष्ट आहे. हा प्रकार समाज आणि समाजातील लोकांची मानसिकता दर्शवत असल्याचं' तिने म्हटलं आहे.

'व्हायरल झालेल्या अडल्ट सीनमध्ये माझ्यासोबत देवही आहे. परंतु व्हायरल होताना ते केवळ राधिकाच्या नावानेच व्हायरल होत आहेत. देव पटेलच्या नावाने ते का व्हायरल करण्यात आले नाहीत?' असा सवाल करत तिने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

याआधी देखील राधिकाचे असे काही फोटो व्हायरल झाले होते. २००५ मध्ये आलेल्या 'पार्च्ड' चित्रपटातील आदिल हुसेनसोबतचे राधिकाचे अडल्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.