मुंबई : अभिनेत्री राधिका आपटेने लैंगिक अत्याचारावर आपलं वेगळं मत व्यक्त केलं आहे.
लैंगिक अत्याचाराचा सामना फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरूषांना देखील करावा लागतो. हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्सटेन वादानंतर मनोरंजन क्षेत्रात घडणारे लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर आले. एका पाठोपाठ एक अशी केविन स्पेसी, जेम्स टोबॅक, ब्रॅट रॅटनर यासारखे अनेक हॉलिवूड दिग्गज व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते.
बॉलिवूडमध्ये अभिनेता इरफान खान हा पहिला असा व्यक्ती आहे ज्याने स्वतः अशा संघर्षातून गेल्याची गोष्ट जगासमोर आणली. यावर राधिका आपटेने असं म्हटलं की, गेल्या कित्येक दिवसांपासून महिला यावर बोलत आहेत. मात्र आता यावर योग्य अशी कारवाई होण्यासाठी मंचाची आवश्यकता आहे.
त्याचसोबत राधिका म्हणाली की, फक्त महिलाच नाही तर पुरूष देखील या लैंगिक अत्याचाराचा सामना करत असतात. मी खास करून या सिने जगतातील गोष्ट करत आहे. मी अशा कित्येक पुरूषांना ओळखते जे लैंगिक अत्याचाराचे शिकार होते. आणि
यावर चर्चा करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. तिने हे देखील सांगितले की, सिनेमा क्षेत्र हे आता वाढत आहे. तसेच विभिन्न जगातील लोकं याचा एक भाग होत चालले आहेत. यामुळे एक असा मंच इथे आवश्यक आहे जिथे यावर चर्चा होईल.
आता या लैंगिक अत्याचाराच्या विषयावर हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडमधील लोकं देखील समोर आले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत मल्लिका दुआ, रिचा चड्डा आणि अभिनेता इरफान खानसोबत लाखो लोकांनी आपला अनुभव शेअर केला. याची सुरूवात अभिनेत्री एलिसा मिलानोने केली होती. त्यावेळी #MeToo असा हॅशटॅग वापरून एक सोशल चर्चा सुरू झाली होती.