सलमानने तेव्हा जे केलं ते पाहून मला लाज वाटली...; नवोदित अभिनेत्याने सांगितला शुटिंगचा 'तो' किस्सा

राघव जुयालच्या 'किल' सिनेमाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या सिमनेमाच्या निमित्ताने सलमान सोबतचा किस्सा राघवने सांगितला. सिनेमाच्या शुटींगमध्ये जे घडलं त्यानंतर राघवला खूप लाजिरवाणं वाटत होतं. असं तो म्हणाला. 

Updated: Jul 27, 2024, 12:32 PM IST
सलमानने तेव्हा जे केलं ते पाहून मला  लाज वाटली...; नवोदित अभिनेत्याने सांगितला शुटिंगचा 'तो' किस्सा title=

राघव जुयालने आतापर्यंत डान्स रियालिटी शोमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. राघवचा नुकाताच 'किल' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याचं सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून देखील भरभरुन कौतुक होत आहे. सिनेमाच्या निमित्ताने नुकतंच राघवने माध्यामांना मुलाखत दिली. राघवने सिनेमाच्या शुटींगचा एक किस्सा सांगितला आहे. 'किल' सिमेमाच्या आधी राघव 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात झळकला होता.

राघवने मुलाखतीत सांगितलं की, तो'किल'आणि 'किसी का भाई किसी की जान' या दोन्ही सिनेमाचं शुटींग एकाच वेळी करत होता. 'किसी का भाई किसी की जान'  सिनेमाच्या शुटींग वेळी सलमान खानने जे काही केलं त्यावरुन मला स्वत:ची खूप लाज वाटते.  'किसी का भाई किसी की जान' आणि 'किल' दोन्ही सिनेमांचं शुटींग  करताना माझी तारेवरची कसरत व्हायची. हे सगळं सलमान खानच्या लक्षात आल्यावर त्यांनी 'किसी का भाई किसी की जान'  शुटींगच्या तारखांमध्ये बदल केले, जेणेकरुन मला शुटींग करताना कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही. शुटींगच्या तारखांमध्ये बदल केल्यामुळे मी दोन्ही  सिनेमातील भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करु शकलो. 'किल' सिनेमातील भूमिकेसाठी  खूपच मेहनत घेतली त्यामुळे मी हा सिनेमा सोडू शकणार नव्हतो. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

'किल'साठी सलमान भाईने मला खूपच सांभाळून घेतलं. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.असं राघव म्हणाला. सलमान सोबत काम करणं म्हणजे फक्त आणि फक्त आनंद आहे असं तो म्हणाला. सलमान खानबद्दल सांगताना राघव म्हणाला की,  मी दोन दिवस त्यांच्या फार्महाऊस होतो. त्यावेळी स्विमिंग केलं आणि डर्ट बाईक राईड केली. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी अविस्मरणीय होता. नव्या सिनेमातील भूमिकेसाठी चाहत्यांनी त्याचं भरभरुन कौतुक केलं. राघव उत्तम डान्सर असण्याबरोबरच तो चांगला अभिनेता देखील आहे. राघवच्या स्लोमो डान्सचे खुद्द रेमो डीसुझा आणि गीता कपूरसारखे कोरीओग्राफर देखील फॅन्स आहेत. आधी डान्स आणि सिनेमांमुळे राघवचं सोशल मीडियावर फॅन्सकडून कौतुक होत आहे.