Pornography Case : मेहुणीसोबत चित्रपट करण्याची राज कुंद्राची इच्छा? 'गंदी बात' फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अश्लिल चित्रपटाच्या प्रकरणामुळे उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Bollywood Life | Updated: Jul 28, 2021, 07:35 AM IST
Pornography Case : मेहुणीसोबत चित्रपट करण्याची राज कुंद्राची इच्छा? 'गंदी बात' फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा title=

मुंबई : अश्लिल चित्रपटाच्या प्रकरणामुळे उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मंगळवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण आणि राज कुंद्राची मेव्हणी शमिता शेट्टीला चित्रपटात कास्ट करण्याच्या विचारत राज असल्याचं 'गंदी बात' फेम गहना वशिष्ठने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी गहनाला देखील अश्लिल चित्रपट बनवण्याच्या प्रकरणार अटक झाली होती.

राज कुंद्रा बॉलीफेम नावाचं एक एप्लिकेशन लाँच करण्याच्या तयारीत होता. यावर गहना वशिष्ठने एका मुलाखतीत सांगितलं की , 'राज कुंद्राच्या अटके पुर्वी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेली होती. तेव्हा मला कळालं काही ते बॉलीफेम नावाचं नवं ऍप्लिकेशन लाँच करण्याच्या तयारीत राज कुंद्रा आहे.'

'या ऍप्लिकेशनमध्ये चॅट शो,  रियालिटी शो, म्यूझीक व्हिडिओ आणि फिचर फिल्म प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला. यामध्ये बोल्ड सीन शूट करण्याचा काही प्लॅन नव्हता. आमची स्क्रिप्टवर देखील चर्चा झाली. शमिता शेट्टी, सई ताम्हणकर आणि अन्य दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार होता '

गहना पुढे म्हणाली, 'मी चित्रपटांचं दिग्दर्शन करणार होती. ही सर्व प्लॉनिंग राज कुंद्राच्या अटकेपुर्वी करण्यात आली होती.' शमिता आणि माझी कधी भेट झाली नाही असं देखील गहनाने सांगितलं.