राज कुंद्रा प्रकरणावर राज ठाकरेंचं खास शैलीत उत्तर

राज ठाकरे यांना आपल्या कॅमेरात व्हिडिओ जर्नालिस्ट चित्रीत करत असताना राज यांना खूपच हसू येत होतं. 

Updated: Jul 29, 2021, 04:41 PM IST
राज कुंद्रा प्रकरणावर राज ठाकरेंचं खास शैलीत उत्तर

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दररोज राज कुंद्रा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. काही मॉडेल्सकडून या प्रकरणाच्या इतर बाजूंचा उलगडा होतो आहे. हे प्रकरण सध्या चांगलच चर्चेत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज कुंद्रा प्रकरणावर खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या मनसे कार्यालयात बसून ते पत्रकारांसोबत संवाद साधत होते. राज ठाकरे यांना आपल्या कॅमेरात व्हिडिओ जर्नालिस्ट चित्रीत करत असताना राज यांना खूपच हसू येत होतं. 

यावेळी राज ठाकरे यांचे सतत फोटो काढले जात होते. त्यामुळे किती वेळा तेच तेच असं म्हणत राज यांनी खास त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिली. नाक, कान, घसा सगळं घेतलं आणखी कसले फोटो काढत आहात असा सवाल राज ठाकरे यांनी केला. 

पुढे राज ठाकरे म्हणाले, "मी काय कुंद्रा आहे, शॉट्स द्यायला", राज ठाकरे यांच्या या स्टेटमेंटचं सध्या चांगलच व्हायरल होत आहे.