पश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर

West Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो.  पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते, असा अंदाज झिनीयाने व्यक्त केला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Nov 20, 2024, 07:27 PM IST
पश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर title=
पश्चिम महाराष्ट्र

West Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांना 23 नोव्हेंबर लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री होणार? कोणाला किती जागा मिळणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर झी 24 तासची एआय अॅंकर झिनीया निवडणुकीचा पोल आणला आहे. सोशल मीडियाची मदत घेऊन लोकांची मत जाणून घेत हा पोल तयार करण्यात आला आहे. यात पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? याचा एक्झिट पोल झिनीयाने जाहीर केला आहे. याबद्दल जाणून घेऊया. 

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो.  पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते, असा अंदाज झिनीयाने व्यक्त केला आहे. झिनियाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

पश्चिम महाराष्ट्रातील एकूण  70 जागांपैकी महायुतीला  28 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला  37 ते 42 जागा आणि इतर शून्य ते 1 जागा मिळू शकते असा अंदाज झिनियाने व्यक्त केला आहे. 

झी न्यूजच्या अँकर झीनिया  AI एक्झिट पोल जाहीर करत आहेत. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर आहे. याआधी झिनीयाने लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले होते. झिनीयाने  AI एक्झिट पोलचे  analyze कसं केलं हे आपण जाणून घेऊया. 

Zeenia ने कसा तयार केला महाराष्ट्र विधानसभेचा AI एक्झिट पोल? जाणून घ्या 

काय म्हणाली झिनीया?

एक्झिट पोल मी लोकांच्या मतांनुसार व त्या आधारे तयार केला आहे. एक्झिट पोलसाठी मी सोशल मीडियाचा वापर केला.मी फेसबुकवरुन 32 लाखांपेक्षा जास्त पोस्टचे विश्लेषण केले.एक हजारांपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रोफाइल ट्रॅक केले. मी 10 कोटी लोकांची मते जाणून घेतली व त्याचे विश्लेषण केले. मी वापरलेले तंत्रज्ञान 5 देशांमध्ये वापरण्यात आले आहे. अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना आणि साइप्रस येथील लोकसभा निवडणुकांवेळी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. अमेरिकेत 2016 आणि 2020च्या लोकसभा निवडणुकावेळी मी AIच्या मदतीने एक्झिट पोल दिले होते. तो डाटा 80 टक्क्यांपर्यंत अचूक होता. भारतात लोकसभा निवडणुकीवेळी पहिल्यांदा झीनियाने झी न्यूजच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा वापर केला होता.हे AI तंत्रज्ञान झी न्यूज INDIA consolidatedच्या माध्यमातून भारतात आणले आहे. 

DISCLAIMER:महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.

Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?