Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठा अखेर मतदान झालं आहे. आता 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र काय निकाल देतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मदारसंघ असलेल्या ठाण्यात मतदारसंघ नेमका काय निकाल देतात याचीही सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान निकालाआधी आम्ही तुमच्यासाठी एक्झिट पोल घेऊन आलो आहोत. Zeenia AI Exit Poll मध्ये ठाण्यात निकाल काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाणे-कोकणात महायुती बाजी मारणार असं दिसत आहे. लोकसभेप्रमाणं विधानसभेलाही महायुतीचं वर्चस्व कायम राहणार असा अंदाज आहे. महायुतीला 39 पैकी 23 ते 28 जागा मिळणार असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे मविआची घौडदौड 9 ते 14 जागांपर्यंतच राहणार आहे.
ठाणे-कोकण 39
महायुती 23-28
मविआ 09-14
इतर 00-03
एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई दिसत आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, महायुतीला 129 ते 159 आणि महाविकास आघाडीला 124 ते 154 जागा मिळतील.
महाराष्ट्र - 288
महायुती 129-159
मविआ 124-154
AI Anchor Zeenia च्या एक्झिट पोलमध्ये जी आकडेवारी दिली होती त्यानुसार, एनडीए आघाडीला 305 जागा, इंडिया आघाडीला 180 जागा आणि इतरांना 58 जागा देण्यात आल्या होत्या. जेव्हा निकाल आले, तेव्हा एनडीए आघाडीला 293 जागा मिळाल्या, ज्या इतर कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा अधिक अचूक आणि वास्तविक आकडेवारीच्या जवळ होत्या. तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या. अशा प्रकारे झी न्यूज एआय अँकर झीनियाचा एक्झिट पोल इतर कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा अधिक अचूक आणि विश्वासार्ह असल्याचं सिद्ध झालं.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झी न्यूजने पहिल्यांदाच Artificial Intelligence वापर करून एक्झिट पोल जारी केला होता. आणि Zee News AI Anchor Zeenia ने दिलेल्या एक्झिट पोलसमोर मोठे दिग्गज फेल ठरले होते.
- यंदाचा एक्झिट पोल हा लोकांच्या समाजमाध्यमांवरच्य प्रतिक्रियांच्या आधारे तयार केला गेला आहे.
- समाजमाध्यमांवरच्या 15 लाखांहून अधिक प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं आणि तोच सँपल साईज आहे.
- महाराष्ट्रातून जवळपास 10 लाख प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं
- इतका मोठा सँपल साइज एक्झिट पोलमध्ये कुणाचाच नसेल.
(महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)