डोक्यावर मुस्लिम टोपी असलेला रजनीकांत, सोबत चक्क कपिल देव! लाल सलामचा ट्रेलर पाहिलात का?

सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र नुकतंच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे.

Updated: Feb 6, 2024, 12:26 PM IST
डोक्यावर मुस्लिम टोपी असलेला रजनीकांत, सोबत चक्क कपिल देव! लाल सलामचा ट्रेलर पाहिलात का? title=

मुंबई : लाल सलाम हा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र रजनिकांत यांच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. कारण नुकतंच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे.  सोमवारी रात्री थलैवा रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रजनीकांत यांची झलक पाहायला मिळत आहे. या सिनेमात रजनीकांत  मुस्लीम व्यक्ती मोईनुद्दीन भाईच्या भूमिकेत दिसत आहेत.

 साऊथ सुपरस्टार रजनिकांतची मुलगी ऐश्वर्याचा आगामी सिनेमा 'लाल सलाम'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांतदेखील त्यांच्या मुलीच्या सिनेमात कॉमिओ रोलमध्ये दिसणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे ज्याचा उद्देश धार्मिक सुसंवाद वाढवणे आहे आणि सेंसेटिव टॉपिकला जोडला गेला आहे. या सिनेमाद्वारे ऐश्वर्याने फिल्ममेकर म्हणून सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. 

समाजाला संदेश देतोय हा सिनेमा
५ फेब्रुवारीला ऐश्वर्या रजनीकांत आणि 'लाल सलाम'च्या टीमने सिनेमाच्या ट्रेलची यूट्यूब लिंक सोशल मीडियावर शेअर केली. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, 'लाल सलाम' समाजाला एक महत्वाचा संदेश देण्यासोबतच एक हार्ड-हिटिंग स्पोर्ट्स ड्रामादेखील आहे.
 
कपिल देव यांचा देखिल असणार कॅमिओ 
लायका प्रॉडक्शनच्या सुबास्करा अल्लिराजा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात विष्णू विशाल, विक्रांत आणि रजनीकांत व्यतिरिक्त विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि थम्बी रमैयादेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. याचबरोबर या सिनेमात क्रिकेट विश्वातील दिग्गज कपिल देवदेखील कॉमिओ रोलमध्ये दिसणार आहेत.

या सिनेमात दिसणार रजनीकांत
रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा गेल्यावर्षी रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दमदार कमाईदेखील केली. लाल सलाम व्यतिरिक्त त्यांच्याकडे Vettaiyan हा सिनेमादेखील आहे. 

एआर रहमान यांच चित्रपटाविषयी मोठं वक्तव्य
या सिनेमाला एआर रहमानने यांनी संगीत दिलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, जेव्हा रजनीकांत यांच्या मुलीने एआर रहमान यांना या सिनेमाची स्टोरी ऐकवली तेव्हा त्याला नेमकं कसं वाटलं. याविषयी बोलताना एआर रहमान म्हणाला,  हा चित्रपट 'कंटाळवाणा' असेल असं मला वाटलं होतं.  "जेव्हा ऐश्वर्याने मला चित्रपटाची कथा पहिल्यांदा सांगितली, तेव्हा मला वाटलं - हा चित्रपट कंटाळवाणा होणार आहे. मला वाटले की हा प्रवचन प्रकार असेल." मात्र चित्रपट पाहिल्यानंतर मी आपला विचार बदलला. "मला गंभीर वाटणारे सीन पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत," असं एआर रहमान म्हणाला.