Rajkummar Rao In Srikanth: राजकुमार राव त्याच्या आगामी श्रीकांत चित्रपटामुळं चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात राजकुमार रावने एका नेत्रहिन व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी राजकुमार रावचे चांगलेच कौतुक होत आहे. राजकुमार राव आता त्यांच्या चित्रपटामुळं तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे. मात्र, एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यालाही संघर्ष करावा लागला होता. आउटसाइडर असल्याने इंडस्ट्रीत त्याला अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. एका मुलाखतीत त्याने हे दुखः बोलून दाखवले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार रावने हा खुलासा केला आहे. त्याने म्हटलं आहे की, सुरुवातीला अनेक चित्रपटातून त्याला रिप्लेस केले गेले. कारण त्याच्या जागी अन्य मोठे कलाकारांना रोल देण्यात यायचा. मला सुरुवातीला अनेक चित्रपटात रिप्लेस करण्यात आले आणि माझ्या जागी मोठ्या कलाकारांना कास्ट करण्यात आले. तेव्हा मला कळलंच नाही काय होतोय. तेव्हा मी विचार करायचो इथे असं पण होतं का. मी गुडगावमधील छोट्याश्या गावातून आलो आहे. त्यामुळं माझ्यासोबत असं होतं का. माझ्याकडे पाहून लोकांना वाटायचे की हा कोणत्याही चित्रपटात लीड अॅक्टर कसा असू शकतो, असं राजकुमार राव यांनी म्हटलं आहे.
राजकुमार राव यांने इंडस्ट्रीची काळी बाजू सांगितल्यानंतर दुसरी बाजूही सांगितली आहे. त्याने फिल्म इंड्रस्टीतील काही कौतुकास्पद गोष्टीही सांगितल्या आहेत. जर तुम्ही छोट्या शहरातून आला असाल तरी काही हरकत नाही. आउटसाइडर असाल तरी तुम्हाला लीड रोड मिळतोच. अभिनेत्याने म्हटलं आहे की, त्याने सुरुवातीला दिबाकर आणि एकता कपूरसोबत पण काम करण्याची संधी मिळाली. पण मला अशा भूमिका करायच्या होत्या ज्या आव्हानात्मक असतील.
राजकुमार रावने म्हटलं आहे की मला पैशांसाठी कोणताही चित्रपट नाही करायचा. पण मी दोन ते तीन असे चित्रपट केले आहेत. ज्याला मी नकार ही देऊ शकलो असतो. मात्र, इमोशनल होईन मी हे चित्रपट केले. आणि मला त्याचे अजिबात वाइट वाटत नाहीये.
राजकुमार राव लवकरच श्रीकांत या चित्रपटात दिसणार आहे. तो नेत्रहिन व्यावसायिक श्रीकांत बोला यांची भूमिका साकारत आहे. त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या व्यंग आड येऊ दिले नाही. सुरुवातीपासून अभ्यासात हुशार असलेल्या श्रीकांत यांना उच्च शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. त्यांना भारतात विज्ञानाची पदवी घेण्याचीही परवानगी नव्हती. तेव्हा जगातील टॉप विद्यापिठाने त्यांना शिक्षणासाठी बोलावले. श्रीकांत यांनी स्वतःच्या हिमतीवर आपली वेगळी ओळख बनवली. त्यांच्याच आयुष्यावर आता चित्रपट येत आहे.