रजनीकांत या दिवशी करणार राजकारणात येण्याची घोषणा

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करु शकतो. 'इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या येणाऱ्या वाढदिवशी ते याची घोषणा करु शकतात.

Updated: Nov 10, 2017, 04:07 PM IST
रजनीकांत या दिवशी करणार राजकारणात येण्याची घोषणा title=

मुंबई : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करु शकतो. 'इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या येणाऱ्या वाढदिवशी ते याची घोषणा करु शकतात.

12 डिसेंबर रोजी रजनिकांत यांचा वाढदिवस असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'रजनिकांत वेगळ्या पक्षांची स्थापना करणार असून इतर कोणत्याही पक्षांमध्ये सहभागी नाही होणार.'

त्यांनी म्हटलं की, जर भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी रजनिकांत यांना सदस्यत्व किंवा त्यांचा सहयोगी म्हणून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील तरी ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली ऊर्जा वाचवतील. आगामी विधानसभा निवडणूक स्टर्लिन विरूद्ध रजनिकांत अशी असावी अशी त्यांची इच्छा आहे.

'अध्यात्मिक असल्याने रजनिकांत हे कट्टरपंथी किंवा दक्षिणपंथी देखील नसणार आहेत. ते सर्व समाजाच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतील.