राजपाल यादव का करतोय मोलमजूरी? अवस्था पाहून चाहते हैराण

राजपाल यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: May 1, 2022, 11:13 PM IST
राजपाल यादव का करतोय मोलमजूरी? अवस्था पाहून चाहते हैराण title=

मुंबई : राजपाल यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो मोल-मजुरी करताना दिसत आहेत. तो डोक्यावर सिमेंटचा टप घेऊन फिरताना दिसत आहे. राजपालचा पोशाखही वेगळा आहे. व्हिडिओत राजपाल बनियान आणि हाल्फ पँन्टमध्ये दिसत आहे. त्यातच त्याला काही माणसं मिळतात. यानंतरचं दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, राजपाल यादवला त्याच्या खास लोकांना पाहताच तो त्याला मोटा भाऊ म्हणून हाक मारतो. यानंतर तो राजपाल यादववर चिडतो. राजपाल त्याला मोठा म्हणत त्याची छेड काढत आहे. यानंतर राजपाल म्हणतो की, मी तुला आदर देत आहे. यानंतर हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहचतं. राजपाल म्हणतो की, मोताभाईला गुजरातीमध्ये मोठा भाऊ म्हणतात. म्हणूनच मी म्हणालो, पण ते लोक मानायला तयार नाहीत. आणि राजपालच्या मागे धावू लागला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जागतिक हास्य दिनानिमित्त राजपाल यादवने हा मजेशीर व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं - तुम्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि कॉमेडियन आहात, तर दुसरा म्हणाला की तुम्ही कमाल आहात