कॉमेडियन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड अवस्थेत, जाणून घ्या Brain Dead म्हणजे काय?

राजू श्रीवास्तव यांच्यावर गेल्या 8 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Updated: Aug 19, 2022, 02:03 PM IST
कॉमेडियन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड अवस्थेत, जाणून घ्या Brain Dead म्हणजे काय? title=

Raju srivastava Brain Dead : प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. गेल्या आठवड्यात 12 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट (WorkOut) करताना ट्रेडमिलवरून हृदयविकाराचा झटका आल्याने ते पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समध्ये (AIIMS-All India Institute of Medical Sciences) दाखल करण्यात आलं होतं. 

गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  डॉक्टरांनी सांगितलं की, 'त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा नाही. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं आहे. 

राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने गुरुवारी त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचं तीने सांगितलं. आपण जाणून घेऊया ब्रेन डेड म्हणजे काय? (What is Brain Dead)

ब्रेन डेड म्हणजे काय? - What is brain dead?
माणसाचा मेंदू पूर्णपणे काम करणं थांबवतो त्या स्थितीला ब्रेन डेड म्हणतात. अशा स्थितीत माणसाच्या मेंदूपर्यंत कोणतेही संकेत पोहोचत नाहीत. ब्रेन डेड झाल्यानंतर माणसाचं शरीर काम करणं थांबवतं. डोळ्यांची उघडझाप, श्वास घेणं आणि शरीराची हालचाल कमी होते असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अशा स्थितीत व्यक्तीचं हृदय सुरु असतं.

ब्रेन डेड झालेल्या रुग्णाला सामान्यपणे श्वास घेता येत नाही, त्यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं, जेणेकरुन त्याचा श्वास सुरु राहिल. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता 0.09 टक्के असते.

ब्रेन डेड अवस्थेत कोणते अवयव काम करतात? - Can organs function after brain death?
ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचा मेंदू काम करत नाही. पण त्याच्या शरीराचे काही अवयव जसं यकृत आणि किडनी व्यवस्थित काम करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रेन डेड ही अशी स्थिती आहे, माणूस जिवंत तर असतो पण त्याला आपल्यासोबत काय होत आहे ये कळत नाही. ब्रेन डेडचा रुग्ण शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असला तरीही प्रतिसाद देत नाही.

ब्रेन डेड झालेला व्यक्ती किती दिवस जिंवत राहू शकतो?
एखादी व्यक्ती ब्रेन डेड असेल तर ती व्यक्ती किती दिवस किंवा किती तास जिंवत राहू शकेल हे ब्रेन डेडच्या कारणावर अवलंबून असतं. काही प्रकरणांमध्ये रुग्ण काही महिनेही जगतो, तर काही प्रकरणांमध्ये ही शक्यता फक्त काही तास असू शकते असं न्यूरोलॉजिस्ट सांगतात. 

राजू श्रीवास्तव यांना जेव्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांचा एमआरआय करण्यात आला.

ब्रेन डेड आणि कोमात फरक काय?
ब्रेन डेड आणि कोमा ही सारखीच स्थिती असल्याचं काही जणांना वाटतं. पण वैद्यकीय भाषेत या दोघांचा अर्थ वेगळा आहे. कोमा स्थितित रुग्णाच्या रिकव्हरीची संधी खूप जास्त असते. रुग्णाचा मेंदू काम करत असतो. कोमात असलेल्या रुग्णाच्या आजूबाजूला काय होत आहे. कोण काय म्हणतंय या सगळ्या गोष्टी त्याच्या मेंदूपर्यंत पोचतात आणि बाकीच्या शरीरालाही सिग्नल देतात. पण ब्रेन डेडच्या बाबतीत या शक्यता नसतात. म्हणजेच कोमा नंतरची स्थिती ब्रेन डेड आहे.