'2 वेळा गर्भपात आणि...', काजोलचा धक्कादायक खुलासा

काजोलनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

Updated: Aug 19, 2022, 01:36 PM IST
'2 वेळा गर्भपात आणि...', काजोलचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल आणि अभिनेता अजय देवगणची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला जवळपास 23 वर्षे झाल्याचे म्हटले जाते. या दोघांना दोन मुलं असून मुलीच नाव न्यासा आणि मुलाचे नाव युग आहे. काजोलनं एका मुलाखतीत तिच्या 2 गर्भपाता विषयी सांगितले.

आणखी वाचा :  ... आणि सर्वांसमोरच बिग बींचे डोळे पाणावले, कारण तितकंच महत्त्वाचं

काजोलला तिच्या वेदनादायक गर्भपाताची आठवण झाली. काजोलचा पहिला गर्भपात हा 'कधी खुशी कभी गम' या चित्रपटा दरम्यान झाला आणि या वेदना सहन करत असताना तिने चित्रपटाला मिळालेलं यश सगळ्यांसोबत साजरे केले नाही. त्यानंतर झालेल्या 2 गर्भपाताविषयी सांगताना काजोल म्हणाली की तिला त्या गोष्टीला सामोरे जाणे अत्यंत कठीण झाले होते, असे सांगताना काजोल भावूक झाली. 

आणखी वाचा : ... आणि अबू सालेम जाळ्यात फसला; DGP रुपिन शर्मांनीच सांगितला 'त्या' प्रसंगाचा थरार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

काजोल आणि अजयनं हलचल या चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इश्क' चित्रपटात दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटात आमिर खान आणि जुही चावला देखील दिसले होते. यानंतर दोघेही 'प्यार तो होना ही था'मध्ये दिसले. या दोघांनी 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघे सगळ्यात शेवटी 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तानाजी'मध्ये एकत्र दिसले होते.