Raju Srivastava चा शेवटचा video पोस्ट करत पत्नीची भावुक पोस्ट..सोशल मीडियावर हळहळ

अलीकडेच राजूची पत्नी शिखाने तिच्या पतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत शिखाने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी वाचून प्रत्येकाचे डोळे ओले होतील.

Updated: Oct 23, 2022, 01:36 PM IST
Raju Srivastava चा शेवटचा video पोस्ट करत पत्नीची भावुक पोस्ट..सोशल मीडियावर हळहळ  title=

मुंबई: ख्यातनाम स्टँड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Death) सर्वांना खळखळून हसवणारा हा जिंदादिल विनोदवीर. मात्र त्याची  अकाली एक्झिट तमाम चाहत्यांना चटका लावून गेली. (legendary standup comedian and actor raju shrivastav died at age of 58 years)

तो स्टँडअप कॉमेडीचा अमिताभ बच्चन होता.तो स्टेजवर आला की, हास्याची कारंजी फुलायची. पोट धरून हसता हसता पुरेवाट व्हायची. त्यानं जिवंत केलेला गजोधर भय्या तर गजब होता. पण आज हा गजोधर भय्या कायमचा पोरका झालाय.. कारण राजू श्रीवास्तव नावाच्या या अवलियानं स्टेजवरूनच नाही, तर आयुष्यातूनच कायमची एक्झिट घेतली.

राजू श्रीवास्तव यांच्या पश्चात पत्नी शिखा श्रीवास्तव, मुलगा आयुष्मान आणि मुलगी अंतरा असा परिवार आहे. त्याच्या घरच्यांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. अलीकडेच राजूची पत्नी शिखाने तिच्या पतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत शिखाने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी वाचून प्रत्येकाचे डोळे ओले होतील.

शिखाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजू रूममध्ये बसून 'यादों में वो सपने में है' गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शिखाने लिहिले आहे की, 'तुला सोडून एक महिना झाला असेल, पण मला माहित आहे की तू माझ्यासोबत आहेस आणि नेहमी राहशील. शिखाने या पोस्टसोबत लिहिलंय ''धड़कनो का बंधन तो धड़कनो से हैं, नैना मेरे असुअन से भरे हुए पूछ रहे गए हो कहा., यादों में हो बातों में हो नही अब तो सिर्फ सपनो में हो''. हे गाणे इतक्या लवकर (फक्त 12 दिवसात) प्रत्यक्षात येईल हे माहित नव्हते. , तू सगळ्यांना हसवशील आणि आम्हाला असे रडवून जाशील असं कधीच वाटलं न्हवत असं त्या म्हणाल्या आहेत. 

सध्या त्यांची ही पोस्ट पाहून सर्वानाच फार भावुक व्हायला होत आहे.