राखी सावंतच्या व्हिडिओवर चाहते नाराज, अश्लिल कमेंटचा पाऊस

 बॉलिवूडची आयटम गर्ल आणि 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: Sep 10, 2021, 09:08 PM IST
राखी सावंतच्या व्हिडिओवर चाहते नाराज, अश्लिल कमेंटचा पाऊस title=

मुंबई : बॉलिवूडची आयटम गर्ल आणि 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणायचं हे अभिनेत्रीला चांगलच माहित आहे. वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' मधून बाहेर आल्यापासून ती सतत चर्चेत असते.

राखी ट्रोलर्सच्या निशाण्याखाली 
राखी सावंत तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करते. आता पुन्हा एकदा राखी सावंत एका व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या अश्लील कमेंटचा पाऊस पडत होता. राखीने 'सावन में लग गई आग' या गाण्यावर डान्स केला.

अलीकडेच राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती तिच्या मित्रासोबत 'सावन में लग गयी आग' या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिचे डान्स स्टेप्स जबरदस्त दिसत आहेत, मात्र अभिनेत्रीचा व्हिडिओ चाहत्यांकडून अश्लील कमेंटने भरला गेला आहे. खरंतर, या काळात राखीने खूप घट्ट ड्रेस घातला आहे, जो चाहत्यांना अजिबात आवडला नाही. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर युजर्सच्या वाईट कमेंट्स येत आहेत. एका चाहत्याने केली आणि लिहिलं, 'लाज राखी, तिने एवढा टाइट ड्रेस का घातला आहे'.

नुकतंच रिलीज झालं 'लॉकडाउन' गाणं
व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'क्या आग लगा है ?' राखी सावंतला बिग बॉस नंतर बरेच प्रोजेक्ट मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिचं 'ड्रीम में एंट्री' हे गाणं रिलीज झालं होतं. त्यानंतर आता राखी सावंतचं दुसरं गाणं 'लॉकडाउन' देखील रिलीज करण्यात आलं आहे, जे चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.