ड्रामा क्वीनच्या बोल्ड गाऊनवर खिळल्या नजरा...नेटकऱ्यांकडून राखीची तुलना उर्फीसोबत

राखी सावंत अतिशय बोल्ड रेड ड्रेस परिधान करून कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर पोहोचली होती.

Updated: May 16, 2022, 02:50 PM IST
ड्रामा क्वीनच्या बोल्ड गाऊनवर खिळल्या नजरा...नेटकऱ्यांकडून राखीची तुलना उर्फीसोबत title=

मुंबईः ड्रामा क्वीन राखी सावंत नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान राखीचा लूक असा होता की सर्व स्टार्समध्ये सर्वांच्या नजरा राखीवरच खिळल्या होत्या. राखी सावंत अतिशय बोल्ड रेड ड्रेस परिधान करून कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर पोहोचली होती. राखी सावंतचा ड्रेस इतका खुलून दिसत असला तरी सर्वांच्या नजरा राखीवर खिळल्या होत्या.

यादरम्यान, राखीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. राखी लाल रंगाच्या फ्रंट आणि साइड कट सिक्विन ड्रेसमध्ये पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. यासोबतच राखी पापाराझींसमोरही अनेक ऍक्शन करताना दिसली. राखीने तिचा ड्रेसला फ्रंट नॉटने जोडत बोल्ड टच दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी राखीच्या या ड्रेसवरून तिला ट्रोल केलं आहे तर काहींनी तिला उर्फी जावेदची स्टाईल कॉपी केल्याचं म्हटलं आहे. मात्र बोल्ड लूकमुळे राखी सावंत पुन्हा चर्चेत आली आहे.

राखीच्या प्रोफेशनल लाईफशिवाय बोलायचं तर राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच राखीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती अनेक ठिकाणी एका व्यक्तीसोबत दिसली होती.