रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्न बंधनात! आनंद कारज परंपरेनं केला विवाह

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding :  रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर अडकले लग्न बंधनात! 

दिक्षा पाटील | Updated: Feb 21, 2024, 05:06 PM IST
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्न बंधनात! आनंद कारज परंपरेनं केला विवाह title=
(Photo Credit : Social Media)

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. गोव्यात त्यांनी आज सप्तपदी घेतल्या आहेत. त्यांचा हा शाही विवाह गोव्याच्या ITC ग्रॅन्ड साऊथ मध्ये झालं. त्यांचं लग्न झाल्याची बातमी अधिकृत असली तरी देखील त्या दोघांनी अजून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी कोणतीही बातमी दिलेली नाही. 

रकुल आणि जॅकीच्या लग्नासाठी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. अनन्या आणि आदित्य या दोघांनी गोव्यात हजेरी लावली आहे. दरम्यान, अशा चर्चा आहेत की ग्लॅमरच्या जगातील आणखी काही कलाकार या लग्नासाठी हजेरी लावणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद कारज परंपरेनुसार, रकुल आणि जॅकीचं लग्न झालं आहे. आता चाहते कपल्सच्या लग्नाच्या फोटोंची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, अजून त्यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा का केली नाही असा प्रश्न देखील त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. ते दोघं दोन पद्धतीनं लग्न करणार आहेत. एक शिख आणि एक संधी अशा दोन पद्धतीनं ते लग्न बंधनात अडकणार आहेत. 

हेही वाचा : स्वत: पत्नीसोबत अफेअर ठेवणारा अभिनेता, अन्नु कपूर यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

रकुल आणि जॅकी यांना त्यांच्या लग्नाला खासगी ठेवायचे होते. त्या दोघांना त्यांच्या लग्नाचे फोटो स्वत: शेअर करायचे आहेत. त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना त्यांचे फोन वापरण्याची परवानगी नाही. त्या सगळ्यांचे फोन त्यांचे सिक्योरिटी गार्डकडून कलेक्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या दोघांचे चाहते त्यांच्या फोटोची प्रतिक्षा करत आहेत. बॉलिवूड अभिनेभी भूमि पेडनेकरचे रकुल आणि जॅकीच्या मेहंदी सेरेमनीतील फोटो व्हायरल झाले होते. तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी संगीतच्या कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स केला होता.