'प्रसिद्ध अभिनेत्री आमदाराच्या रिसॉर्टमध्ये गेली...' म्हणणाऱ्या नेत्याविरुद्ध कारवाई! काय आहे प्रकरण

अभिनेत्री तृषा कृष्णनला आज कोण ओळखत नाही. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र सध्या अभिनेत्री या प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Updated: Feb 21, 2024, 05:04 PM IST
'प्रसिद्ध अभिनेत्री आमदाराच्या रिसॉर्टमध्ये गेली...' म्हणणाऱ्या नेत्याविरुद्ध कारवाई! काय आहे प्रकरण title=

मुंबई : अभिनेत्री तृषा कृष्णन AIADMK चे माजी नेता एवी राजू यांच्या अश्लिल वक्तव्यावर चांगलीच भडकली आहे आणि तिने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. नुकतंच , ए.व्ही. राजू यांनी त्रिशा कृष्णन यांच्याबद्दल अश्लील विधान केलं होतं. त्यांच्या अश्लिल विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. याचबरोबर अभिनेत्रीने नेत्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

ए.व्ही. राजू यांनी पक्षाचं उल्लंघन केल्याप्रकरमी  17 फेब्रुवारीला AIADMK मधून काढून टाकण्यात आली होती कारण त्यांनी पार्टीच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. काढून टाकल्यानंतर त्यांनी त्रिशा क्रिष्ननला घेवून एक वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती. 

त्रिशा आमदाराच्या रिसॉर्टमध्ये गेली असल्याचा एवी राजू यांचा आरोप 
एवी राजू यांनी दावा केला आहे की, तृषा कृष्णनला एका आमदाराच्या रिसॉर्टवर बोलावलं होतं. यासाठी अभिनेत्रीला एक मोठी रक्कमही दिली गेली. एवी राजू यांनी पुढे सांगितलं की, या संदर्भातला एक व्हिडीओ एका यूजरने X वर शेअर केला जो लगेजच व्हायरल झाला. सगळीकडून एवी राजू यांच्यावर टीका होऊ लागली आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मागणीही होवू लागली.  
तृषा कृष्णनदेखील यानंतर चांगलीच संतापली. अभिनेत्रीने X वर एवी राजू यांच्यावर तिचा राग काढला आणि कायदेळीर कारवाईची धमकी दिली. तिने एवी राजू यांचं नाव घेण्याआधी लिहीलं की, 'हे पाहून  घृणास्पद वाटतं. निर्लज्ज लोकं लोकांच लक्षं वेधण्यासाठी किती खालच्या पातळीवर घसरतात. बाकी तुम्ही बेफिकीर राहा. आवश्यक आणि कठोर कारवाई केली जाईल. आता जे काही सांगितलं आणि केलं जाईल ते माझी लिगल डिपार्टेमेंट करेल. '

या संपुर्ण प्रकरणानंतर प्रोड्यूसर रविंद्रनाथ म्हणाली की, 'एआयएडीएमकेचे माजी नेते ए.व्ही. राजू यांनी त्रिशाबद्दल केलेल्या अयोग्य, खोट्या आरोपांमुळे मी हैराण आणि निराश झाले आहे. हे 2024 आहे, आम्ही महिला सक्षमीकरण आणि समानतेबद्दल बोलत आहोत.ज्याचा काहीही संबंध नाही अशा माणसाला विनाकारण चिखलात ओढलं जात आहे.'' असं प्रोड्यूसर रविंद्रनाथने सांगितलं.''

एवी राजूआधी नोव्हेंबर 2023 मध्ये मंसूर अली खानने तृषा कृष्णनवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. अभिनेता आणि प्रोड्यूसर मंन्सूर अली खानने तृषासोबत लिओ सिनेमात काम केलं होतं. मंन्सूरने तृषाबाबत सांगितलं होतं की, त्यांनी अभिनेत्रीसोबत बेडरुम सीन करण्याचा चान्स गमावला. या विधानंतर मन्सूर अली खान यांच्यावर टीका होत असताना त्यांनी त्रिशा कृष्णनची माफी मागितली होती.