पूर्ण कपडे घालूनही रकुल प्रीत सिंह Oops Moment ची शिकार, फोटो व्हायरल

सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंगचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

Updated: Jan 29, 2022, 08:28 PM IST
पूर्ण कपडे घालूनही रकुल प्रीत सिंह Oops Moment ची शिकार, फोटो व्हायरल title=

मुंबई : रकुल प्रीत सिंगने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती, मात्र अजय देवगणच्या 'दे दे प्यारी दे' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिचा ठसा उमटवला. रकुल आजकाल चित्रपटांपेक्षा इंटरनेटवर जास्त लोकप्रिय आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोंसाठी चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या चाहत्यांसाठी अनेक फोटो किंवा व्हिडीओ देखील अपलोड करत असते. नुकताच रकुल प्रीतचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटला बळी पडताना दिसत आहे.

खरेतर सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंगचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा पारदर्शक वन पीस घातला आहे. हा ड्रेस पारदर्शक होता याकडे रकुलने लक्ष दिले नाही. ज्यामुळे तिच्यासोबत हा प्रकार घडला.

रकुलने काळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता. ज्यावर लाईट पडताच तिचे आतील कपडे दिसू लागले. अभिनेत्रीचे अंडरगारमेंट्स स्पष्ट दिसत असल्यामुळे एकच खळवळ उडाली. कदाचित रकुलला याची जाणीव झाली असावी, कारण ती घाईघाईने गाडीतून निघून गेली. हे पापाराझीने घेतलेले फोटो सोशल मीडियावरती सर्वत्र व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी रकुलने दीपिका पदुकोणच्या 'गहेरियां' चित्रपटाच्या टायटल साँगवरचा तिचा व्हिडीओ शेअर केला होता. या गाण्यावर अभिनेत्रीने तिची काही स्थिर फोटो देखील टाकले आहेत.

सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत रकुल प्रीत सिंहने लिहिले की, 'स्वत:वर आणि तुमच्या प्रियजनांच्या प्रेमात असण्यामुळे रोज सकाळ तुम्हाला उठण्यायोग्य बनवते. डेप्थ मोड.' अभिनेत्रीच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती. चाहत्यांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी, रकुल प्रीत सिंगच्या वाढदिवसानिमित्त, पूर्वीचा अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांचे नाते अधिकृत केले होते. एक रोमँटिक फोटो शेअर करताना जॅकीने चाहत्यांना ही खुशखबर दिली. या फोटोमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी एकमेकांचा हात धरताना दिसत होते.