मुंबई : संजय लीला भन्साली यांचा पद्मावती हा चित्रपट रिलीज झाला, तर यापुढे भन्सालींच्या एकाही चित्रपटाचं शुटिंग होऊ देणार नाही असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिलाय.
राम कदम हे फिल्म शुटिंग सेट्स अँड अलाईड मजदूर संघाचे अध्यक्ष आहेत. ही संघटना आशियातील सर्वात मोठी फिल्म कारागिरांची संघटना आहे. संजय लीला भन्साली वारंवार इतिहासाची अवहलेना करून समाजाच्या भावना दुखवाण्याचा प्रयत्न करतात, असा कदम आणि त्यांच्या संघटनेचा आरोप आहेत.
महाराणी पद्मावती,रवल रतन सिंग आणि अल्लाउद्दीन खल्जी यांंच्या प्रमुख भूमिकेतील हा चित्रपट सुरूवातीपासूनच वादामध्ये अडाकला होता. करणी सेना, राजपूत संघटना यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. येत्या 1 डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित होणार आहे.