Debina Bonnerjee Leaves her Daughter For School: लहान मुलं ही मोठी होतात आणि मग ती शाळेत जायला लागतात. तेव्हा पालकांना त्यांना शाळेत पहिल्यांदा सोडायला जायचे असते परंतु तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर आल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव प्रत्येक पालकांसाठी कठीण असतो. आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलं ही आता स्वत:च्या पायावर उभी राहून शाळेत जातात तेव्हा तो क्षण पाहणं त्यांच्यासाठी फारच जडही जातं. परंतु ही वेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येते. अशीच ही वेळ आली आहे ती अभिनेत्री देबिना बॅनर्जीवर. आपल्या लाडक्या मुलीला पहिल्यांदा शाळेत घेऊन जाताना तिला आपले अश्रू सावरता आले नाहीत. देबिना ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यातून ती युट्यूबवरही ती आपले व्हीलॉग शेअर करत असते.
अशाच एका लेटेस्ट व्हीलॉगमध्ये तिनं आपल्या लेकीच्या पहिल्या शाळेचा अनुभव शेअर केला असून यावेळी तिला आपले अश्रू सावरता आलेले नाहीत. यावेळी तिनं आपल्या लेकीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यात ती शाळेत जाताना दिसते आहे आणि तिच्या मागे बॅक लागलेली दिसते आहे. त्यामुळे यावेळी तिच्या लेकीचा हा शाळेतला लुकही व्हायरल झाला आहे.
लियाना ही IVF तंत्रज्ञानानं देबिना आणि गुरमित चौधरीला झालेली पहिली मुलगी आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांना पहिलं अपत्य झालं याविषयी देबिनाही उघडपणे बोलली आहे. आता देबिनाची मोठी मुलगी ही शाळेत जायला लागली आहे. लियाना आताशी 14 महिन्यांची आहे. खरंतर इतक्या लहान वयात लियाना शाळेत कशी काय जाते आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहेच परंतु सध्या जमाना बदलला आहे आणि पेरेटिंगच्याही गोष्टी आता बदलू लागल्या आहेत. भारतीय शिक्षण प्रणाली द्वारे आता लहान मुलांचे प्री-स्कूल हे 1.5 पासून 3 वर्षांपर्यंत आहे. यावर देबिनानं एक व्हीलॉग तयार केला आहे. ज्यात तिला आपल्या लियानाला शाळेत सोडताना अश्रु अनावर झाले आहेत.
हेही वाचा - इटलीत असलेल्या प्रभासच्या विलाचे एका महिन्याचे भाडे किती माहितीये? वाचून डोळे गरगरतील
21 जूनला डेबिनानं आपल्या इन्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात देबिनानं लिहिलं होतं की तिची मुलगी शाळेत जाते आहे आणि तिनं ट्रॅक पॅट शर्ट घातला आहे. यावेळी गाडीतून आपल्या लेकीला शाळेत सोडताना देबिनाला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली की, मी परत रडायला लागले आहे. मला असं वाटतंय की माझी मुलगी फारच लवकर मोठी होते आहे. तेव्हा मी फारच घाबरले आहे. मी फार आनंदी आहे परंतु मला रडूही येते आहे. मला आता तिच्या जन्माच्या वेळेचा चेहरा आठवतो आहे. यावेळी गुरमितही आपल्याला लेकीला सोडायला आला होता.