Ae Dil Hai Mushkil: ऐश्वर्या जवळ येताच रणबीरची 'ही' अवस्था का झाली?

aishwarya rai bachchan, anushka sharma, Karan johar, ranbir kapoor, Bollywood, Bollywood video ऐश्वर्यासोबतच्या इंटिमेट सीनवेळी रणबीरचा थरथराट

Updated: Oct 28, 2021, 03:33 PM IST
Ae Dil Hai Mushkil: ऐश्वर्या जवळ येताच रणबीरची 'ही' अवस्था का झाली?

मुंबई : ‘ऐ दिल है मुश्किल’ (Ae Dil Hai Mushkil) चित्रपट जरी अभिनेत्री ऐश्वर्या  राय, अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणबीर कपूर यांची मैत्री आणि प्रेमाभोवती फिरत असला तरी अनेकांसाठी हा चित्रपट प्रचंड जवळचा आहे. आज ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित होवून पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण होवूनही अनेक किस्से आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. चित्रपटात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे रणबीर आणि ऐश्वर्याचं रिलेशनशिपचा. 

एका मुलीची आई झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण केलं. तेव्हा दिग्दर्शक करण जोहरने ‘ऐ दिल है मुश्किल’चित्रपट काम करण्याची ऑफर  ऐश्वर्याला दिली. तेव्हा करणने स्क्रिप्टच्या गरजेनुसार चित्रपटात किसिंग सीन करण्यासाठी अट घाताली. पण बच्चन कुटुंबाची सून असल्यामुळे ऐश्वर्यासमोर काही मर्यादा होत्या. 

त्यानंतर ऐश्वर्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. अशात करणने ऐश्वर्याला समजावून  योग्य पद्धतीने सीन शूट करू असं सांगितलं. अखेर ऐश्वर्याने चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. रणबीर कपूर चित्रपटसृष्टीत मोठा झाला असला तरी ऐश्वर्यासारख्या अभिनेत्रीसोबत बोल्ड आणि इंटिमेट सीन करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. 

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने सांगितले की, ऐश्वर्यासोबत इंटिमेट सीन शूट करताना तो इतका घाबरला होता की त्याचे हात थरथरू लागले होते. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करणं त्याच्यासाठी भयंकर होते. रणबीरची अवस्था पाहून ऐश्वर्याने त्याला सीन व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला. 

त्यानंतर रणबीर म्हणाला, 'अशी संधी पुन्हा कधी चालून येणार नाही, त्यामुळे मी देखील मौक्यावर चौका मरला....' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना त्यांची केमिस्ट्री आवडली परंतू काहींनी मात्र बच्चन कुटुंबाची सून असल्यामुळे ट्रोल देखील केलं. एवढंच नाही तर बच्चन कुटुंबाला देखील ऐश्वर्याची भूमिका आवडली नव्हती.