Ranbir Alia Wedding: ताज हॉटेल नाही, तर 'या' ठिकाणी होणार रिसेप्शन

'दुल्हन हम ले जायेंगे...' या ठिकाणी संपन्न होणार आलिया-रणबीरचं रिसेप्शन...   

Updated: Apr 14, 2022, 10:12 AM IST
Ranbir Alia Wedding: ताज हॉटेल नाही, तर 'या' ठिकाणी होणार रिसेप्शन title=

मुंबई :  अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेते रणबीर कपूर यांचं आज लग्न आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया-रणबीर त्यांच्या नात्याला नवीन नाव देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. आज शुभ मुहूर्तावर दुपारी 3 वाजता रणबीर आणि आलिया लग्न बंधनात अडकणार. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.

लग्न झाल्यानंतर ताज हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार असल्याचं समोर आलं होतं. पण आलिया-रणहीरचा रसेप्शन सोहळा ताज हॉटेलमध्ये नाही, तर वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यात रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. 

Ranbir- Alia Wedding : रणबीर- आलियाच्या 15 मजली घराबद्दल 'या' गोष्टी ठाऊकच नसतील

दरम्यान, आता दोघांच्या लग्नाची तयारी मोठ्या थाटात सुरू आहे. बुधवारी मेहंदी झाल्यानंतर आज सकाळी हळदीचा कर्यक्रम रंगणार आहे. 11 वाजती हळदी समारंभ सुरू होणार आहे. 

लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी लग्न ठिकाणी पोहोचले आहेत. नितू कपूर, सोनी राजदान आणि आलियानंतर आता तिची बहिण शाहीन भट्ट लग्न ठिकाणी पोहोचले आहेत. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.