Animal म्हातारा रणबीर कोण, रणविजय की अजीज? लवकरच मिळेल उत्तर, निर्मात्याने दिली हिंट

२०२३ मधील सगळ्यात हिट झालेल्या सिनेमांपैकी 'ॲनिमल' या सिनेमाचं नाव घेतलं जात. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आता या सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated: Jan 31, 2024, 06:11 PM IST
Animal म्हातारा रणबीर कोण, रणविजय की अजीज? लवकरच मिळेल उत्तर, निर्मात्याने दिली हिंट title=

मुंबई : एनिमलच्या सक्सेसनंतर प्रत्येकजण या सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत आहे. या सिनेमाच्या सेकंड पार्टचं नाव एनिमव पार्क आहे. नुकताच याचा खुलासा करण्यात आला आहे की,  एनिमल 2 ची स्क्रिप्टची बेसिक स्ट्रक्चर तयार झालं आहे. संदिप वांगा एनिमल २ची स्क्रिप्टवर खास करणार आहेत. ते यावर्षीच्या शेवटच्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करणार आहेत. रणबीर 'एनिमल 2'चं शूटिंग 2025 मध्ये सुरु करतील. 

मिड डेच्या रिपोर्टनुसार एनिमल पार्कमध्ये रणविजय आणि त्याच्या डुप्लिकेटमध्ये क्लैश दाखवण्यात येणार आहे. याचसोबत त्याचं त्याच्या पत्नीसोबत आणि मुलासोबतच्या नात्यावर. जेव्हा एनिमलच लिखाण सुरु होतं. तेव्हाच या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टचा बेसिक तयार केला गेला होता. सेकंड पार्टचा फोकस रणविजय आणि डुप्लिकेटवर असेल. सोबतच रणविजयचा आपल्या मुलासोबत

सेकंड पार्टवर रणबीर कपूरचं वक्तव्य
नुकताच रणबार कपूरने एनिमलबाबक कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी चर्चा केली. नेटफ्लिक्स इंडियासोबत बोलताना रणबीर म्हणाला, ॲनिमल पार्कच्या संदीपकडे 1-2 सीन्स तयार आहेत जे त्याने मला सांगितलं होतं आणि ते खूपच एक्साइटिंग आहे.  पहिल्या भागाच्या यशानंतर त्याला अजून डीप आणि खोलात जाण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. तो काहीही करू शकतो.

एनिमलबद्दल बोलायचं झालं तर, १ डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला होता. रणबीरसोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ति डिमरी आमि बॉबी देओलने महत्वाची भूमिका साकारली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणबीरकडे अनेक सिनेमा आहेत. तो लवकरच नितीश तिवारीच्या रामायण सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे. यासोबतच तो संजय लीला भंसाळीच्या लव एंड वॉरमध्ये दिसणार आहे. या सिनेात तो आलिया भट्टा आणि विक्की कौशलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

एनिमल हा सिनेमा २०२३ मधील सगळ्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. रणबीरसोबतच या रश्मिका, तृप्ती डिमरी, बॉबी देओलला या सिनेमातून अधिक लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा इतका गाजला की, सगळीकडे याच सिनेमाची चर्चा होती. आता या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं शूटींग कधी सुरु होईल हे आपल्याला येता काळच सांगू शकेल.