या अभिनेत्रीचा पूर्ण फोटो पाहिल्यावर फॅन्स म्हणतायेत, "पाण्यात आग लावली"

स्वत:च्या बॉडीवर चांगलीच मेहनत घेत तिने पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे.   

Updated: Jul 18, 2021, 05:29 PM IST
या अभिनेत्रीचा पूर्ण फोटो पाहिल्यावर फॅन्स म्हणतायेत, "पाण्यात आग लावली" title=

मुंबई : भोजपुरी सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रानी चॅटर्जीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या फिटनेसवर बोलायला सुरुवात केली होती. लोकांना प्रत्यूत्तर देण्यासाठी अभिनेत्रीने आपल्या फिटनेसकडे लक्ष देत पुन्हा एकदा फिट अंदाजात कमबॅक केलं आहे. जीममध्ये जाऊन वर्कआऊटवर भर देत तिने परफेक्ट फिगर बनवलं आहे. 

रानी चॅटर्जीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जीममधील घाम गाळतानाचे काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. स्वत:च्या बॉडीवर चांगलीच मेहनत घेत तिने पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे. 

नुकताच रानी चॅटर्जीने पूल साईटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ब्लॅक बिकनीत रानी चटर्जीचा बोल्ड अंदाज चांगलाच भाव खाऊन जातोय. या फोटोवर  फॅन्सने लाईक्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोमध्ये रानी चॅटर्जी स्विमींग पूलच्या किनारी बसली आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. नुकताच रानी चॅटर्जीचं अल्बम साँग देखील प्रदर्शित झालं आहे. इंस्टाग्रामवर रानीचा मोठा चाहतावर्ग आहे. रानीचे इंस्टाग्रामवर 1 मिलियन हून अधिक फॉलोवर्स असून तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात.