दुर्गा पुजेच्या निमित्ताने रानू मंडल यांनी छेडले सूर

इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडलने सर्वांच्या मनात घर केले आहे.

Updated: Sep 23, 2019, 05:00 PM IST
 दुर्गा पुजेच्या निमित्ताने रानू मंडल यांनी छेडले सूर  title=

मुंबई : इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडलने सर्वांच्या मनात घर केले आहे. आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. 'तेरी मेरी' गाण्याच्या यशानंतर त्यांचं दुसरं गाणं देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दसऱ्याचे औचित्य साधत त्यांचं दुर्गा पुजेचं गाणं चाहत्यांना ऐकता येणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत येण्याआधी त्यांनी हे गाणं कोलकातामध्ये रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं बंगाली पूजा थिम गाणं होतं. हे गाणं गायक बिजॉय सिलने तयार केलं आहे. 

बिजॉय सिल एक चहा विक्रेत्याचा मुलगा आहे. त्याचप्रमाणे तो देखील एक चहा विक्रेता आहे. 'तेरी मेरी' या गाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याला उत्तम कलाटणी मिळाली आहे. रानू मंडल आणि हिमेशचं हे गाणं सध्या चांगलचं चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस पडताना दिसत आहे. 

रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांची गाणी गात आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज यशाच्या मार्गाकडे प्रवास करत आहे. त्यांच्या या प्रवासाला जोड आहे ती म्हणजे त्यांना मिळालेल्या दैवी देणगीची म्हणजे त्यांच्या आवाजाची. रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x