Deepika And Ranveer : घरात कुणाची मनमानी चालते? रणवीरचं उत्तर ऐकून चाहते हैराण

दोघांची केमिस्ट्री केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही खूप पसंत केली जाते.  

Updated: Dec 9, 2022, 12:06 PM IST
Deepika And Ranveer : घरात कुणाची मनमानी चालते?  रणवीरचं उत्तर ऐकून चाहते हैराण

Deepika Padukon Ranveer Singh : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer singh) हे बॉलिवूडमधील पॉवर  कपलपैकी एक आहेत. दीपिका आणि रणवीर (Deepika  - Ranveer) एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि सात जन्मासाठी एक झाले. महत्त्वाचं म्हणजे दीपिका आणि रणवीर चाहत्यांना देखील कायम कपल गोल्स (couple goals) देत असतात.

दोघांची केमिस्ट्री केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही खूप पसंत केली जाते.  गुरुवारी, 8 डिसेंबर रोजी, सर्कस चित्रपटातील करंट लगा रे हे गाणे रिलीज झालं, ज्यामध्ये दीपिका पदुकोणचा रणवीर सिंगसोबतचा धमाकेदार डान्स चाहत्यांना खूप आवडला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

घरी कोणाचं चालतं?
रणवीर सिंगसोबत 'करंट लगा रे' गाण्याच्या लाँचिंग इव्हेंटला दीपिका पदुकोणनेही हजेरी लावली होती. त्याचवेळी चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीही उपस्थित होता. यादरम्यान रणवीर आणि दीपिकाची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळाली. इव्हेंटमध्ये रणवीर सिंगने सांगितलं की, त्यांच्या घरात कोणाचं चालतं. गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमादरम्यान या जोडप्याला विचारण्यात आले की दोघांपैकी घरात कोणाचं चालतं. या प्रश्नाचं उत्तर देत रणवीर सिंग म्हणतो, 'ना माझं ऑफिसमध्ये चालत ना घरी. तुम्हाला काय वाटतंय.' याशिवाय रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या कार्यक्रमात खूप मस्ती करताना दिसले.

'सर्कस' हा सिनेमा 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वी त्याचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. दीपिकाने 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'ओम शांती ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीझोतात येण्याआधी दीपिका यशस्वी मॉडेल होती. पण आज दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच सक्रिय नसून हॉलिवूडमध्ये  देखील अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.  (deepika padukone twitter)