शाहिद कपूर आहे कंट्रोल फ्रिक तर रणवीर बेडवरुन लवकर उतरत नाही; जाणून घ्या सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेट

Bollywood Celebrities Bedroom Secrets: आज आम्ही तुमहाला सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेटबद्दल सांगणार आहोत.

Updated: Dec 9, 2022, 12:31 PM IST
शाहिद कपूर आहे कंट्रोल फ्रिक तर रणवीर बेडवरुन लवकर उतरत नाही; जाणून घ्या सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेट title=

Bollywood Celebrities Bedroom Secrets : आपले आवडते कलाकार काय करतात, ते कसे राहातात, काय घालतात हे सगळं जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? चाहते त्यांच्या प्रोफेशनलपासून पर्सनल लाईफपर्यंत सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडतं. आता लोक त्यांच्या स्टार्सच्या बेडरूममध्येही डोकावू लागले आहेत आणि त्यांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आज आम्ही तुमहाला सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेटबद्दल सांगणार आहोत.

शाहिद कपूर आहे कंट्रोल फ्रीक
2015 साली शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत ( Shahid Kapoor and Meera Rajput )  नेहा धुपियाने होस्ट केलेल्या टॉक शोमध्ये पोहोचले होते. या मुलाखतीदरम्यान एक टास्क आला. ज्याचं नाव 'स्केरी स्पाइस' असं होतं.या सेगमेंटमध्ये मीराला विचारण्यात आलं की, बेडमधली तुझी आवडती पोझिशन कोणती आहे? हा प्रश्‍न ऐकून शाहिद कपूर थोडा लाजला, मात्र, मीरा अजिबात लाजली नाही. मीराकडे प्रश्नाचं उत्तर न देण्याचा पर्याय होता, पण तिने लगेच प्रश्नाचं उत्तर दिलं. मीराने सांगितलं की, शाहिद नेहमी बेडवर काय करायचं ते सांगतो. ती म्हणाली, 'मला वाटते की तो कंट्रोल फ्रीक आहे. काय करायचे ते तो नेहमी सांगतो.

करीनाला बेडवर हव्या असतात या तीन गोष्टी
करिनाने बेडरूम सीक्रेट खुलेआम सांगितल्याचं पहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, ''मला झोपण्याच्या अगोदर तीन गोष्टी माझ्या जवळ नेहमी लागतात. या ३ गोष्टी काय आहेत नेमक्या जाणून घेवुयात करीना कपूर खान आणि सैफ अली खान  कायम दोघें आपल्या लव लाइफमुळे चर्चेत असतात. दोघांची लव स्टोरी आणि केमिस्ट्री लोकांना खूप पसंद आहे. करीना कपूर खानने शोच्या शूटिंग दरम्यान बेडरूम सीक्रेट शेअर केलं. सेलिब्रिटी कुकिंग शो Star VS Food शूटिंगच्या  दरम्यान मैत्रिण तान्या घावरी बरोबर खास गप्पा मारल्या. करीनाने यावेळी झोपण्याच्या अगोदर तीन गोष्टी माझ्याजवळ नेहमी लागतात एक वाइनची बॉटल, पजामा आणि पति सैफ अली खान.''

शिल्पा शेट्टीचा फेवरेट जॉनर 50 शेड्स ऑफ ग्रे
एका मुलाखती दरम्यान शिल्पाचा पती राज कुंद्राने त्याचं बेडरूम सिक्रेट शेअर केलं आहे. हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डे चा आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. तेव्हा राज कुंद्राने स्वतःबद्दल काहीतरी सांगितलं, जे ऐकून शिल्पा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. खरंतर क्विझ शो दरम्यान राज कुंद्राला काही प्रश्न विचारले जातात. शिल्पा शेट्टीची आवडती लव्हस्टोरी कोणती? यावर थेट  राज कुंद्राला बोलायला जाणार इतक्यात शिल्पा चिडते आणि म्हणते राज! इतक्यात शिल्पा काही बोलण्यापूर्वीच राज घाईत म्हणतो "फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे".

बेडवरुन लवकर खाली उतरायचं नाव नाही घेत रणवीर  
अभिनेत्रीने रणवीरबद्दल तिच्या बेडरूमचं सिक्रेट सगळ्यांसमोर शेअर केलं. जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  तिला रणवीरच्या स्टाईल आणि सौंदर्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा दीपिका म्हणाली की, तो बराच वेळ शॉवर घेतो. याशिवाय ते टॉयलेटमध्येही बराच वेळ घालवतो. तिने पुढे सांगितलं की, तो बेडवरतीही खूप वेळ लावतो. आता दीपिकाची ही गोष्ट ऐकून सगळेच थक्क झाले. ती काय बोलली हे पाहून तिचा नवराही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मग दीपिकाने हे प्रकरण हाताळले आणि म्हणाली की, बेडवरुन उठायला देखील खूप वेळ लावतो.