मुंबई : रणवीर सिंह त्याच्या अभिनयासोबतच भूमिकेसाठी घेत असलेल्या मेहनतीमुळेही सतत चर्चेमध्ये असतो.
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावत' या आगामी चित्रपटासाठी रणवीरने शरीरावर खूपच मेहनत घेतली आहे. 'हल्क' लूक प्रमाणे दिसणार्या रणवीर सिंहने आता ' गली बॉय' या चित्रपटासाठी पुन्हा वजन घटवले आहे. पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या चित्रपटासाठी त्याने घेतलेली मेहनत अनेक तरूणांना प्रेरणादायी ठरत आहे. मग पहा कशी घेतली रणवीरने मेहनत ?
अहमद मुस्तफा हा रणवीर सिंहचा ट्रेनर होता. ऋतिक रोशनप्रमाणे रणवीरच्या बॉडी ट्रान्सफरमेशनसाठी अहमदने मेहनत घेतली आहे. वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अहमदने रणवीरने रूटीन शेअर केले आहे.
रणवीरच्या व्यायामामध्ये मूवमेंट पॅटर्न, मोबिलिटी ड्रिल्स, हाय इंटेनसिटी इंटरवल ट्रेनिंग करत होता. या सोबतच पुशअप, डेडलिफ्ट आणि स्क्वॉट्सचा सहभाग होता. रणवीर सहा दिवस वर्क आऊट करत होता.
रणवीर व्यायामासोबतच डाएटच्या बाबतीतही दक्ष होता. रणवीरने आहारातून गोडाचे पदार्थ कमी केले होते. रणवीरच्या डाएटकडेही मुस्तफाचे लक्ष होते. पद्मावत चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरूवातीपासूनच त्याच्या आहारातून साखर कमी करण्यात आली आहे.
रणवीरच्या आहारात दोन दिवस चीट मिल डे होते. या दिवसात जंक फूड आणि गोड पदार्थ खायला परवानगी होती.
रणवीर सकाळी 20-25 मिनिटं कार्डिओ व्यायम करत होता. त्यानंतर 40-45 मिनिटं वेट ट्रेनिंग करत होता. संध्याकाळीदेखील दीड तास रणवीरला ट्रेनिंग दिले जात असे. यामध्ये हेवी वेट लिफ्टींगचा समावेश असे.
रणवीरला वर्कआऊट करण्याला एक दिवस सुट्टी दिली जात असे. अशा दिवशी रणवीर स्विमिंग करत असे.