मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सध्या त्याच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या बघायला मिळत आहे. पण त्याच्याविषयीच्या अशा एका गोष्टीची चर्चा अधिक रंगली आहे, ज्या गोष्टीचा त्याच्या सिनेमाशी काहीही संबंध नाही.
आमिर खानचे चाहते केवळ भारतातच नाहीतर देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात आहेत. पण हे चाहते कधीकधी आपल्या लोकप्रिय स्टारला अडचणीत टाकतात. असाच एक किस्सा आमिर खानसोबत झाला होता. आमिरची एक फिमेल फॅन त्याला भेटली. त्याच्या ऑटोग्राफ आणि त्याच्यासोबत सेल्फी घेतला. पण तिने आणखीही एक मागणी केली. त्या फिमेल फॅनची ही मागणी ऎकून आमिर हैराण झाला. त्या फिमेल फॅनने अशी काही मागणी केली की, ती पूर्ण करणे आमिरला जमलं नसतं.
आमिर खान याने या गोष्टीचा खुलासा एका टॉक शोमध्ये केला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी किरण राव देखील होती. त्याने सांगितले की, तो एकदा एका फिमेल फॅनची मागणी ऎकून हैराण झालो होतो. मला कुणी पसंत करतं, हे कळल्यावर मला आनंद होतो. पण शोच्या होस्टने आमिरला फिमेल फॅनचा किस्सा सांगण्याची विनंती केली.
त्यावर आमिर म्हणाला की, ‘मला स्पष्ट बोलणारे लोक पसंत आहेत. मला आठवतं की, एक मुलीगी थेट मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे, अशी म्हणाली होती’. आमिरने सांगितलेली ही गोष्ट ऎकताच किरण राव म्हणाली की, ‘तू मला हे सांगितलं का नाही’.