बॉलिवूडच्या 6 स्टार्सकडून शेहनाज गिलचा असा छळ, ऑनस्क्रीनही सोडलं नाही...

शहनाज गिलच्या शत्रूंची यादी बरीच मोठी आहे.

Updated: Aug 24, 2021, 06:32 PM IST
बॉलिवूडच्या 6 स्टार्सकडून शेहनाज गिलचा असा छळ, ऑनस्क्रीनही सोडलं नाही... title=

मुंबई : शहनाज गिलच्या शत्रूंची यादी बरीच मोठी आहे. बिग बॉसमधून लोकप्रियता मिळवलेल्या शहनाज गिल या दिवसात सतत चर्चेत आहे. शहनाज गिलच्या आयुष्यात एक काळ असा होता, जो फोटोशूटपासून सुरु झाला आणि आता सगळ्या टीव्ही शोमध्ये पाहुणी म्हणून पोहोचेपर्यंतचा, जेव्हा लोकांनी तिचा अपमान करण्याचा खूप प्रयत्न केला. आज आम्ही तुम्हाला शहनाज गिलच्या शत्रूंबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या.

रश्मि देसाई
रश्मी देसाईने बिग बॉसच्या घरात शहनाज गिललला अनेकवेळा अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. रश्मी देखील शहनाज गिलवर चिडायला लागली कारण ती सिद्धार्थ शुक्लाची चांगली मैत्रीण बनली होती.

देवोलीना भट्टाचार्य
काही महिन्यांपूर्वी, जेव्हा सिद्धार्थ आणि शहनाज गिलचा 'भुला देगा' हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला, तेव्हा देवोलीनाच्या एका कमेंटने खूप गोंधळ उडाला. या व्हिडिओमध्ये शहनाजच्या जागी रश्मी असती तर बरं झालं असतं असं देवोलीना म्हणाली होती.

हिमांशी खुराना
बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी हिमांशी खुराना आणि शहनाज गिल यांच्यामध्ये 36चा आकडा होता. बिग बॉसमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये खूप भांडणं झालं. या दरम्यान हिमांशीने शहनाजला खूप चांगलं आणि वाईट म्हटलं होतं.

पारस छाबरा
बिग बॉसच्या सुरुवातीला पारस आणि शहनाजमध्ये चांगली मैत्री होती पण नंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. यानंतर पारसने शहनाज गिलचा खूप अपमान केला.

माहिरा शर्मा
माहिरा शर्मा आणि पारस छाबरा यांच्यात चांगली मैत्री होती आणि याच कारणामुळे शहनाज गिलला तिचे डोळे आवडत नव्हते.

आरती सिंह
शहनाज गिलचे आरतीसोबतचं नातही सामान्य होतं पण काही आठवड्यांतच दोघांमध्ये खोल वैर निर्माण झालं.